औद्योगिक विभागा तील अनधिकृत बांधकामा विरोधात वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन
डोंबिवली , शंकर जाधव : कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत अनधिकृत बांधकामे जोरात सुरु असताना दुसरीकडे डोंबिवली एमआयडीसी विभागात अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष होत आहे.शुक्रवारी औद्योगिक विभागातील अनधिकृत बांधकामाविरोधात वंचित बहुजन आघाडीने धरणे आंदोलन केली.
वंचित बहुजन आघाडीचे डोंबिवली शहर अध्यक्ष सुरेंद्र ठोके यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी औद्योगिक विभागातील एमआयडीसी कार्यालयावर धडक मोर्चा काढून निषेध नोंदविला. यावेळी पदाधिकारी राजू काकडे, मिलिंद साळवे, आनंद जावळे, रेखा कुरवरे, बाजीराव माने, अर्जुन केदार, नंदू पाईकराव, अशोक गायकवाड, तेजस कांबळे, रोहित इंगळे यांचासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
एमआयडीसी कार्यकारी अभियंता संजय ननावरे यांना वंचित बहुजन आघाडी तर्फे अनधिकृत बांधकामबाबत मिळणारे प्रोत्साहन आणि अधिकाऱ्यांची कामांची पद्धत यावर माहिती देण्यात आली.अनेकवेळा या विषयाअनसरून पत्रे दिली असल्याचे ठोके यांनी सांगितले. पत्रे देऊनही काही कारवाई होत नसल्याने निषेध नोंदवीत असून जर पुढील काळात कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला.
यावेळी ननावरे यांनी वंचित आघाडीला कारवाईचे आश्वासन दिल्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे ठोके यांनी सांगितले.दरम्यान कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत अनधिकृत बांधकामाविरोधात पालिका प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून गप्प बसली आहे.सामजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर हे अनधिकृत बांधकाम विरोधात गेली ७२ दिवस डोंबिवलीतील पालिकेच्या विभागीय कार्यालयाबाहेर आंदोलन करत आहेत.

Post a Comment