Header AD

विनामास्क फिरणाऱ्या चारचाकी, दुचाकी स्वारांवर पोलिसांची कारवाई

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण मध्ये विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर बाजारपेठ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान अनेक व्यक्तीनी मास्क वापरला नव्हता.बाजारपेठ पोलीस स्टेशनचे व.पो.नि. यशवंत चव्हाण यांच्या पथकाने कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहन चालक आणि पायी चालणाऱ्या व्यक्तींची तपासणी केली. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्य परिवहन बस चा चालक सुद्धा मास्क वापरत नाही हे दिसून आले. पोलिसांनी बिना मास्क फिरणाऱ्या अनेक  कार चालकबाईक स्वाररिक्षा चालक यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाईचा बडगा उगारला. यावेळी विना मास्क फिरणाऱ्याकडून दंड देखील वसूल करण्यात आला आहे.  

विनामास्क फिरणाऱ्या चारचाकी, दुचाकी स्वारांवर पोलिसांची कारवाई विनामास्क फिरणाऱ्या चारचाकी, दुचाकी स्वारांवर पोलिसांची कारवाई Reviewed by News1 Marathi on February 23, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मनविसेच्या विधान सभा शहरअध्यक्ष पदी मिलिंद म्हात्रे

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  मनविसेचे सागर जेधे यांनी मनविसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर मनसेचे जुने कार्यकर्ते मिलींद म...

Post AD

home ads