पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या सुविधांसाठी जागरूक नागरिकाचे आमरण उपोषण
कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात मुलभूत सुविधांची वानवा असून रुग्णांना या सुविधा मिळाव्यात यासाठी कल्याण मधील जागरूक नागरिक सत्येंद्र त्रिपाठी पालिका मुख्यालयाच्या बाहेर आमरण उपोषणाला बसले आहेत.
रुक्मिणीबाई रुग्णालयात एक देखील आयसीयु वार्ड असून त्वरित आयसीयु वार्ड सुरु करण्यात यावा. रुग्णालयात एमबीबीएस, एमडी व एमएस डॉक्टर पूर्ण वेळ नियुक्त करावेत. रुग्णालयात एक्सरे, सिटी स्कन, एमआरआय, सर्व रक्त चाचण्या करण्याची सुविधा सूरु करण्यात यावी. रुग्णालयातील महिला डॉक्टर खाजगी प्रक्टिस करत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
रुग्णालयात सर्व औषधांचे जेनेरीक ब्रांड उपलब्ध करण्यात यावेत. आदी मागण्यांचे निवेदन सत्येंद्र त्रिपाठी यांनी पालिका प्रशासनाला दिले होते. मात्र ३५ दिवस उलटून देखील याबाबत कारवाई न झाल्याने आज पासून ते पालिका मुख्यालया बाहेर आमरण उपोषणाला बसले आहेत.जो पर्यंत रुक्मिणीबाई रुग्णालयात या सर्व सुविधा उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत आपले उपोषण सुरु ठेवणार असल्याचे सत्येंद्र त्रिपाठी यांनी सांगितले.
Post a Comment