Header AD

खासदार दिलदार, लेकीन चमचों से लोग परेशन

 

◆शिवसेना नगरसेवकाच्या बॅनरमुळे सेनेतील अंतर्गत वाद चव्हाटय़ावर...


कल्याण ,  कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवलीतील मनसेला शिवसेनेने खिंडार पाडले ही बातमी ताजी असतानाच कल्याणमध्ये शिवसेनेतील अंतर्गत वाद एका बॅनरमुळे चव्हाट्यावर आला आहे.


कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त झळकलेल्या बॅनरवर खासदार दिलदार आहे, मात्र चमचो से लोग परेशान असा मजकुर लिहिल्याने कल्याणमधील शिवसेनेत सारं काही अलबेल नसल्याचे दिसून येत आहे. केडीएमसीचे  शिवसेना नगरसेवक व माजी सभापती मल्लेश शेट्टी यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नेतीवली नाक्यावर हा बॅनर लावला आहे. या बॅनरवर शुभेच्छा तर खासदारांना दिल्या आहेत परंतु चमचो से परेशान हा शाब्दिक टोला कोणाला मारला आहे याचीच चर्चा सर्वत्र रंगली आहे.


कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका लक्षात घेऊन सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी इतर राजकीय पक्षातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची पळवापळवी सुरु झाली आहे. याची सुरवात शिवसेना आणि भाजपाने केली असली तरी या बॅनरमुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद बाहेर आल्याने भविष्यात शिवसेनेतील शिवसैनिक इतर पक्षात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.      
खासदार दिलदार, लेकीन चमचों से लोग परेशन खासदार दिलदार, लेकीन चमचों से लोग परेशन Reviewed by News1 Marathi on February 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads