महावितरण कार्यालया समोर कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
कल्याण , कुणाल म्हात्रे : केंद्र सरकारच्या वीज उद्योगाच्या खाजगीकरण धोरणाविरूद्ध तसेच वीज बील २०२० व स्टॅन्डर्ड बिलींग डॉक्युमेंट रद्द करण्याच्या व नवीन तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीकरीता उर्जा विभागातील कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संप पुकारला असुन त्या अनुषंगाने कल्याण परिमंडळ महावितरण कर्मचाऱ्यांनी कल्याणच्या तेजश्री कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन केले.
या आंदोलनात वर्कर्स फेडरेशनचे संयुक्त सचिव कॉ. औदुंबर कोकरे, केंद्रिय सल्लागार कॉ. टी. सी. भोईर, ज्येष्ठ नेते कॉ. जे. आर. पाटील, मा. वि. जोगळेकर, आयटकचे कॉ. उदय चौधरी तसेच वर्कर्स फेडरेशनचे सर्व झोनल, सर्कल, विभागीय पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले. केंद्र सरकारच्या खाजगीकरणाच्या धोरणाविरोधात, कामगार कायदे धोरणाविरोधात तसेच शेतकऱ्यांच्या कृषी बिल विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला. वीज बिल कायदे रद्द झाले नाही तर हा लढा आणखी आक्रमक करण्याचा निर्धार या ठिकाणी व्यक्त करण्यात आला.

Post a Comment