Header AD

मनसे डोंबिवली शहर अध्यक्ष पदी मनोज घरत यांची नियुक्ती

 डोंबिवली ,  शंकर जाधव  :  मनसे उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहरअध्यक्ष राजेश कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने डोंबिवली शहरअध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करणार असा प्रश्न मनसैनिकांना पडला होता.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे डोंबिवली शहरअध्यक्षपदी मनोज घरत यांची नियुक्ती केल्याने मनसैनिकांमध्ये पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण पसरले आहे.या नियुक्तीबाबत घरत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानले.


घरत यांच्यावर पुन्हा शहरअध्यक्षपदी धुरा सोपवली जाणार याची चर्चा शहरात रंगली होती.घरत यांना यापूर्वीही शहरअध्यक्ष पद दिले होते. त्यानंतर राजेश कदम यांना शहरअध्यक्ष बनविण्यात आले होते.घरत हे पुन्हा डोंबिवलीत मनसेचे आक्रमक आंदोलन करतील आणि डोंबिवलीत पुन्हा एकदा मनसेला चर्चेत आणतील आणि आगामी केडीएमसी निवडणुकीत मनसेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडणूक आणतील असा विश्वास कार्यकर्त्यानीव्यक्त केला आहे.

मनसे डोंबिवली शहर अध्यक्ष पदी मनोज घरत यांची नियुक्ती मनसे डोंबिवली शहर अध्यक्ष पदी मनोज घरत यांची नियुक्ती Reviewed by News1 Marathi on February 02, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads