राष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धेसाठी कल्याण मधील २ खेळाडूंची निवड
कल्याण : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन फॉर डिसेबल नागपुर आणि कोशिश फाउंडेशनच्या वतीने १८ ते २८ फेब्रुवारी दरम्यान नागपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय दिव्यांग टी २० स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात कल्याण मधील २ खेळाडूंची निवड झाली आहे. रविंद्र संते आणि कल्पेश गायकर अशी या खेळाडूंची नावे आहेत. तर मुंबई संघात ठाणे संघातून सौरभ मुंडे, भूषण कांबळे, आणि सुनील वेडे यांची निवड झाली आहे. खेळाडूंच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वच स्तरांतून कौतुक होत असून होणाऱ्या सामन्यांनासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहे.
राष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धेसाठी कल्याण मधील २ खेळाडूंची निवड
Reviewed by News1 Marathi
on
February 17, 2021
Rating:

Post a Comment