Header AD

टिटवाळा येथे धनुर्विद्या आणि नेमबाजीचे प्रशिक्षण




कल्याण  , कुणाल  म्हात्रे  :  सिद्धिविनायक युवा संस्था टिटवाळा यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या युवा सर्वांगीण विकास कार्यक्रम अंतर्गत टिटवाळा येथे ४० युवक व युवतींना धनुर्विद्या आणि नेमबाजीचे शस्त्र प्रशिक्षण देण्यात आले.


या उपक्रमात टिटवाळाबनेलीआंबिवली तसेच वासिंद आदी भागातील युवक व युवती सहभागी झाले होते. क्रीडा प्रशिक्षक व राज्य युवा पुरस्कार विजेते विनायक कोळी तसेच क्रीडा प्रशिक्षक हरीष वायदंडे यांनी सर्व सहभागींना धनुर्विद्या आणि नेमबाजी या ऑलिंपिक खेळ प्रकाराविषयी व क्रीडा साहित्याच्या वापरासंदर्भात तांत्रिक माहिती दिली.


या उपक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून टिटवाळा पोलिस ठाण्याचे नवनिर्वाचित वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजु वंजारीआनंद जाधव, राजेश एगडे, मनोज पवार आणि कुणाल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी रीत्या संपन्न होण्यासाठी क्रीडा प्रशिक्षक संतोष मुंढे आणि गणेश गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

टिटवाळा येथे धनुर्विद्या आणि नेमबाजीचे प्रशिक्षण  टिटवाळा येथे धनुर्विद्या आणि नेमबाजीचे प्रशिक्षण Reviewed by News1 Marathi on February 25, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महापालिकेस लिंडे कंपनी कडून अतिरिक्त 15 टन ऑक्स‍िजनचा पुरवठा : महापौर नरेश म्हस्के

ठाणे  , प्रतिनिधी  :   गेल्या काही दिवसांपासून सर्वत्रच ऑक्स‍िजनचा पुरवठा अपुरा पडत होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांनी...

Post AD

home ads