Header AD

खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसा निमित डोंबिवलीत मोफत पीयूसी शिबीर

 


डोंबिवली , शंकर जाधव  : कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेच्या वतीने पूर्वेकडीक स्टेशनजवळील केळकर रोडवरील रिक्षा थांबा येथे रिक्षचालकांसाठी मोफत पीयूसी शिबीराचे आयोजन करण्यात आले.या शिबिराचे उद्घाटन शिवसेना उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे आणि माजी नगरसेवक तात्या माने यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराचा अनेक रिक्षाचालकांनी लाभ घेतला.ज्या रिक्षाचालकांनी पीयूसी करून घेतली त्यांना शिवसेनेच्या वतीने प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र देण्यात आले.यावेळी उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ म्हणाले, शिवसेना नेहमीच जनतेसाठी काम करत असते.खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज हे शिबीर आयोजन करण्यात आले आहे. त्यांचे कौतुक करतो.


यावेळी महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेचे अध्यक्ष तात्या माने, संजय मांजरेकर, सरचिटणीस दिंगबर गिरा, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर राठोड,सुनील भातकर,शाखाप्रमुख आमोद वैद्य, समीर फाळके,निलेश चव्हाण,शैलेश चव्हाण, महिला आघाडी उपविभागप्रमुख साधना मालवी,भारती कदम,शानभाग आदींनी अथक मेहनत घेतली.तर जीनेश पाटील यांचे या शिबिराला विशेष सहकार्य लाभले. यावेळी महिला रिक्षाचालक आरती पवार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले राजेश कदम यांनी या शिबिराला भेट दिली.

खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसा निमित डोंबिवलीत मोफत पीयूसी शिबीर खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसा निमित डोंबिवलीत मोफत पीयूसी शिबीर Reviewed by News1 Marathi on February 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads