Header AD

आयटीसी लि.ने किराणा दुकानांना ‘नेक्स्ट जनरेशन रिटेल’ म्हणून सज्ज करण्या साठीच्या प्रयत्नांचा वेग वाढवला


◆‘नेशन फर्स्ट: सब साथ बढे’ या त्यांच्या सर्व समावेशक प्रगतीच्या तत्वाला अनुसरून त्यांनी रिटेलर्स सोबतची भागदारी केली अधिक मजबूत....


नॅशनल, १० फेब्रुवारी २०२१ : गेल्या काही वर्षांत आयटीसी ने रिटेलर्सशी आपली भागीदारी बळकट केली आहे. आयटीसी च्या नेटवर्कमध्ये २० लाखांहून अधिक चॅनल पार्टनर्स आहेत. गेल्या दोन दशकांमध्ये आयटीसी लि.ने अन्नपदार्थ आणि इतर एफएमसीजी व्यवासायांमध्ये पदार्पण केले. त्यांची जागतिक दर्जाची उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी देशभरातील रिटेलर्सनी त्यांचे अनमोल सहकार्य देऊ केले आणि आशीर्वाद Bingo!, YiPPee!, सनफिस्ट बिस्किट्स, कँडीमॅन, B Natural, फबेल, ITC Masterchef इत्यादी अन्नपदार्थ क्षेत्रातील लोकप्रिय ब्रँड घडविले. त्यांचा मार्केट शेअर भक्कम आहे आणि ही उत्पादने कन्झ्युमर फ्रान्चायझी झाली आहेत.


‘नेशन फर्स्ट: सब साथ बढे’ या आयटीसी लिमिटेडच्या तत्वाला अनुसरून कंपनीने महामारीच्या सुरुवातीपासूनच, ग्राहकांपर्यंत अत्यावश्यक उत्पादने पोहोचविणाऱ्या पुरवठा साखळीतील शेवटचा बिंदू असलेल्या हजारो किराणा दुकाने आणि जनरल स्टोअर रिटेलर्सच्या सुरक्षिततेची खातरजमा करण्याच्या प्रयत्नांचे नेतृत्व केले. स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या आवश्यकतांचे पालन करत दुकान चालविण्यास मदत करण्यासाठी रिटेलर्सना उपकरणे आणि साहाय्य देण्यात आले. या महामारीमध्ये आयटीसी ने रिटेलर्सना भविष्याच्या दृष्टीने सज्ज करण्यासाठी डिजिटल साधने विकसित करण्यासाठी आपल्या संशोधन व विकासाला अधिक वेग दिला आणि या बहुआयामी प्रयत्नांची परिणती एका एकमेवाद्वितीय अशा व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये झाली. 


स्थानिक इकोसिस्टिम आणि किराणा व्यापाऱ्यांना बळकटी देण्यासाठीचे पहिले पाऊल म्हणून आयटीसी लि.ने रिटेलर्सना रिटेल व्यवस्थापन, डिजिटल इकोसिस्टिमचा वापर याविषयी प्रशिक्षण देण्यासाठी आणि त्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी ‘डिजिटल एनेबलमेंट फॉर किराणा आउटलेट्स’ ही शिखर परिषद आयोजित केली. त्याचप्रमाणे भविष्यकाळात व्यवसाय वाढविण्यासाठी आणि टिकून राहण्यासाठी, कंपनीतर्फे खास विकसित करण्यात आलेल्या डिजिटल उपाययोजना त्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या.


या व्हर्च्युअल समिटमध्ये देशभरातील एक हजार पाचशे चार रिटेलर्स सहभागी झाले होते. १६ जानेवारी २०२१ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या समिटच्या निमित्ताने ‘मोस्ट व्ह्यूअर्स फॉर रिटेल मॅनेजमेंट लाइव्ह स्ट्रीम ऑन अ बिस्पोक प्लॅटफॉर्म’साठी गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्स® स्थापन केला. ‘एक श्याम आप के नाम’ या मोठ्या व्हर्च्युअल इव्हेंटचा हा एक भाग होता.

आयटीसी लि.ने किराणा दुकानांना ‘नेक्स्ट जनरेशन रिटेल’ म्हणून सज्ज करण्या साठीच्या प्रयत्नांचा वेग वाढवला आयटीसी लि.ने किराणा दुकानांना ‘नेक्स्ट जनरेशन रिटेल’ म्हणून सज्ज करण्या साठीच्या प्रयत्नांचा वेग वाढवला Reviewed by News1 Marathi on February 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads