Header AD

महाराष्ट्राच्या ५४व्या निरंकारी संत समागमाचा शुभारंभ
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  सत्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या पावन सानिध्यात महाराष्ट्राच्या ५४व्या तीन-दिवसीय प्रादेशिक निरंकारी संत समागमागमाचा भव्य शुभारंभ हर्षोल्हासपूर्ण वातावरणात आज २६ फेब्रुवारी रोजी सम्पूर्ण अवतार वाणी’ तसेच सम्पूर्ण हरदेव वाणीच्या पदांच्या गायनाने झाला


       समागमाचे प्रसारण व्हर्च्युअल रूपात सायंकाळी  ते रात्री ९ वाजेपर्यंत निरंकारी मिशनची वेबसाईट आणि संस्कार टी.व्ही. चॅनलवर होत असून त्याचा आनंद जगभरातील समस्त भाविक भक्तगण आणि प्रभुप्रेमी सज्जन प्राप्त करतील. या कार्यक्रमामध्ये सद्गुरुच्या पावन दर्शनाबरोबरच भक्तीसंगीत आणि व्याख्यानांच्या माध्यमातून संत-महात्म्यांचे ओजस्वी व प्रेरणादायी विचार श्रवण करता येतील. या वर्षी कोरोना महामारीमुळे समागमाची व्यवस्था व्हच्र्युअल रूपात अशा प्रकारे करण्यात आली आहे ज्यायोगे भक्तगणांना तशीच अनुभूती यावी जशी खुल्या प्रांगणातील समागम मंडपामध्ये बसून मिळते.


       या वर्षी समागमाचा मुख्य विषय स्थिरता ठेवण्यात आला आहे. मानवतेने युक्त सहजसरळ व सुंदर जीवन जगण्यासाठी जीवनातील प्रत्येक पैलूमध्ये स्थिरतेची नितांत आवश्यकता आहे. मग ही स्थिरता आहे तरी कायती प्राप्त करण्याचा उपाय कोणता आणि मानवी जीवनाशी तिचा संबंध तरी काय आहेया सर्व तथ्यांच्या बाबतीत समागमाच्या तिन्ही दिवशी वेगवेगळ्या माध्यमांतून चर्चा केली जाईल. प्रत्येक दिवसाच्या कार्यक्रमाच्या शेवटी सत्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांचे अमृतमय प्रवचन होईल. 


       पूर्वेतिहास पाहिला तर दरवर्षी समागमा प्रारंभ महाराष्ट्राच्या विविध भागांसह देशाच्या इतर प्रांतांतील लोकसंस्कृतींचे प्रतिनिधित्व करत अनेकतेत एकतेचे दर्शन घडविणाऱ्या रंगीबेरंगी शोभायात्रेद्वारे होत आला आहे. तथापिया वर्षी समागमामध्ये मराठी भाषा आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बोलीभाषांसह देशातील अन्य भाषांच्या माध्यमातून भक्तीगीतेअभंगवाणीकविता आणि व्याख्यानांच्या माध्यमातून अनेकतेत एकतेचा अद्भुत संगम पहायला मिळेल ज्यातून सर्वांना सद्भाव आणि एकत्वाची प्रेरणा प्राप्त होईल.

महाराष्ट्राच्या ५४व्या निरंकारी संत समागमाचा शुभारंभ महाराष्ट्राच्या ५४व्या निरंकारी संत समागमाचा शुभारंभ Reviewed by News1 Marathi on February 26, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महानगरपालिका उभारणार प्राणवायू प्रकल्प २० टन प्राणवायू क्षमतेचे प्रकल्प ३० एप्रिल पर्यंत होणार कार्यान्वित

ठाणे , प्रतिनिधी ;  प्राणवायूचा होणारा मर्यादित पुरवठा आणि त्यामुळे होणारी रूग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने प्राणवायू निर्मा...

Post AD

home ads