Header AD

डोंबिवली तील के.व्ही.पेंढारकर महाविद्याल याला स्वायत्त दर्जा

 डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या के.व्ही.पेंढारकर महाविद्यालयाला विद्यापीठाच्या अनुदान आयोगाने दहा वर्षाच्या कालावधीसाठी स्वायत्त दर्जा दिला आहे.परदेशी विद्यापीठातील उच्च शिक्षणकौशल्यावर आधारित अभ्यासक्रम तयार करणेपरिक्षा घेणे आणि कोर्स फी बाबत पेंढारकर महाविद्यालयास स्वायत्त दर्जा मिळाल्याने डोंबिवली आणि परिसरातील शैक्षणिक पातळीचा स्तर उंचावणार  असल्याची ग्वाही  संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.स्वायत्त दर्जा मिळविलेले हे ठाणे जिल्ह्यातील आठवे महाविद्यालय आहे.      विद्यापीठ अनुदान आयोगाच्या स्थायी समितीच्या  ११ फेब्रुवारीच्या २०२१ च्या  बैठकीत पेंढारकर महाविद्यालयास स्वायत्तता बहाल करण्याचा निर्णय घेण्यात आला.२०२०-२०२१ ते २०२९ - २०३० पर्यंत दहा वर्षाच्या कालावधी साठी स्वायत्तता मंजूर करण्यात आली आहे.एमएससीइन फायनान्सएमएससी इन डाटा सायन्ससर्टिफिकेट कोर्स इन एपीकल्चर( मधमाशी पालन),  सर्टिफिकेट कोर्स इन इनकम टँक्स अँड जीएसटी ई रिटर्नएमएससीइन फिजिक्स रिसर्चआणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करणारे कौशल्यावर आधारित कोर्स सुरु करण्यात येणार आहेत.पेंढरकर महाविद्यालयात वर्ग खोल्या मोठ्या प्रमाणावर असल्याने नव्याने सुरु होणाऱ्या कोर्स मधील विद्यार्थी संख्या सामावून घेण्याइतपत जागा उपलब्ध असल्याचे प्रभाकर देसाई यांनी सांगितले.

डोंबिवली तील के.व्ही.पेंढारकर महाविद्याल याला स्वायत्त दर्जा डोंबिवली तील के.व्ही.पेंढारकर महाविद्याल याला स्वायत्त दर्जा Reviewed by News1 Marathi on February 20, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads