आगरी समाज प्रबोधन संस्थेच्या वतीने इच्छुक आगरी वधू वर परिचय व निवड मेळावा
डोंबिवली ( शंकर जाधव ) गुरुवारी सायंकाळी डोंबिवली पूर्वेकडील पिंपळेश्वर महादेव मंदिरात आगरी समाज प्रबोधन संस्थेची बैठक पार पडली.या बैठकीत आगरी समाज प्रबोधन संस्थेच्यावतीने २१ मार्च रोजी दुपारी २ वाजता पिंपळेश्वर महादेव मंदिरात इच्छुक आगरी वधू-वर परिचय व निवड मेळावा घेण्याचे ठरविण्यात आले आहे.
या बैठकीत संस्थेचे पदाधिकारी काळू कोमास्कर, संजय चौधरी, राजेश चौधरी,हनुमान पाटील,राम म्हात्रे,पद्माकर पाटील यश अनंता जाधव आणि संदीप रॉय आदि उपस्थित होते.सामुदायिक लग्न सोहळ्याची तारीख ठरविली नसून कोरोनाच्या परिस्थितीवर पुढील तारीख निश्चित करण्यात येईल असे सांगितले. इच्छुक आगरी वधू-वर परिचय व निवड मेळाव्यात ज्यांचे लग्न ठरेल त्या जोडप्यांनी जर संस्थेच्या सामुदायिक लग्न सोहळ्यात विवाह केला तर त्यांना लग्नाचा खर्च आणि १ लाख रुपये देण्यात येतील असे पदाधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले.

Post a Comment