Header AD

सत्तेतील राजकीय पक्षांना आंदोलन करण्याची काय गरज शालिनी ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल
डोंबिवली , शंकर जाधव : पेट्रोल आणि डीझेल वाढीबाबत राज्यात शिवसेनेचे केंद्र सरकार विरोधात आणि भाजपचे वीज बिल वाढी संदर्भात राज्य सरकारविरोधात आंदोलने झाल्याने एकेकाळी केंद्रात आणि राज्य हातात हात मिळवून सत्तेत बसले होते.मात्र शिवसेनेशी बिनसल्याने शिवसेनेने भाजपला बाजूला करून महाविकास आघाडी सरकार बनवले.तर केंद्रात भाजपा सरकारमधील शिवसेनेने बाजूला होणे पसंत केले.आता हे दोन्ही पक्ष एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहेत. या दोन्ही पक्षांनी केलेल्या आंदोलनावर मनसेने कडकुन टीका केली.सत्तेतील राजकीय पक्षांना आंदोलन करण्याची काय गरज ? असा सवाल मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी डोंबिवलीत केली. डोंबिवलीत एका कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.


मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली शहर संघटक तथा कल्याण ग्रामीण घारीवली गावचे माजी सरपंच योगेश पाटील आणि वैशाली पाटील यांच्या वतीने डोंबिवली पूर्वेकडील पलाव सिटी येथील कासा बेला गोल्डमधील सेंट्रर ग्राउंड येथे हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवली होती.शालिनी ठाकरे यांना पत्रकारांनि विचारले असता त्या म्हणाल्या, सत्तेवरील पक्षांनी आंदोलन करण्याची गरज नव्हती.सरकार चालवत आहात ना मग. या समस्येवर विषयावर मार्ग काढावा लागेल. जनतेला समजून घेणे आवश्यक असून त्यावर निर्णय घेतला पाहिजे असे मत व्यक्त केले. २०२० वर्षात लोक कोरोनामुळे बाहेर पडत नव्हती. डोंबिवलीत आयोजित केलेल्या या हळदीकुंकू समारंभाच्या निमित्ताने का होईना लोक एकत्र आली याचा आनंद वाटतो. 


या समारंभात योगिता पाटील,मनसे महिला पदाधिकारी मंदा पाटील, माजी नगरसेविका सरोज भोईर, वैशाली पाटील, माजी नगरसेविका कोमल पाटील, दीपिका पेंडणेकर,शर्मिला लोंढे,स्वप्ना पाटील, सुमेधा थत्ते, प्रतिभा पाटील आदिसह अनेक पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी डोंबिवली शहर संघटक तथा कल्याण ग्रामीण घारीवली गावचे माजी सरपंच योगेश पाटील, जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर, डोंबिवली शहरअध्यक्ष मनोज घरत, राहुल कामत अरुण जांभळे, प्रकाश माने आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.या कार्यक्रमात मराठी अभिनेत्री दिपाली कांबळे यांनीही उपस्थिती दर्शविली होती.

सत्तेतील राजकीय पक्षांना आंदोलन करण्याची काय गरज शालिनी ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल सत्तेतील राजकीय पक्षांना आंदोलन करण्याची काय गरज शालिनी ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल Reviewed by News1 Marathi on February 07, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads