एनआरसी कामगारांच्या समर्थनार्थ मोहने, आंबिवली बंद
कल्याण , कुणाल म्हात्रे : मोहने येथील एन.आर.सी कामगारांचा प्रश्न शासन दरबारी पोहोचवा याकरिता कामगार व महिलावर्ग ठिय्या आंदोलना बरोबर रास्ता रोकोचा प्रयत्न करीत असतानाच गेल्या पाच दिवसांपासून कामगारांनी बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे. कामगारांच्या या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज मोहने बंदची हाक देण्यात आली होती. या बंद मध्ये दुकानदार, रिक्षा चालक यांनी आपली दुकानं, बाजारपेठा आणि रिक्षा बंद ठेवून पाठिंबा दिला.
एनआरसी कामगारांचे मोहने गेट येथे धरणे आंदोलन सुरू असुन कामगाराची थकित देणी मिळण्याबाबत कामगार वर्ग महिलावर्गासह आंदोलन करीत आहे. या आंदोलनास पंचक्रोशीतील ग्रामस्थ मंडळाने पंठिबा दिला असुन आज मोहने, अटाळी, आंबिवली वडवली, गाळेगाव परिसरातील दुकाने बंद ठेवण्याच्या हाकेला उतस्फूर्त प्रतिसाद मिळाला. कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी आंदोलनाच्या ठिकाणी आज सकाळी जाऊन कामगारांनी पुकारलेल्या लढ्यास पंठिबा दिला असुन जो पर्यंत कामगारांची थकित देणी मिळत नाही तो पर्यंत अदानीस एकही वीट लावु देणार नाही अशी परखड भुमिका घेतली आहे.
या कामगारांच्या प्रश्नाबाबत लवकरच पालकमंत्री यांच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्र्यांकडे कामगार शिष्टमंडळाची बैठक लावुन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. यातून निश्चित मार्ग निघेल. तसेच पोलीसांना लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या कामगारावर दडपशाही धोरण अवलंब करू नका त्यांना आंदोलन करू द्या असा सज्जड दम दिला. यावेळी आयटकचे पदाधिकारी उदय चौधरी, भीमराव डोळस, रामदास वळसे पाटील आदींसह मोठ्या संख्येने कामगार आणि महिलावर्ग आंदोलनात सहभागी झाले आहेत. कामगारांच्या या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आज मोहने, आंबिवली आणि आसपासच्या परिसरात बंदची हाक देण्यात आली होती. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले.
Post a Comment