शिवसेना आणि युवा सेनेच्या मदतीने महिलांसाठी डोंबिवलीत रोजगार प्रशिक्षण
डोंबिवली , शंकर जाधव : लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने संसाराची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आता महिलांनीही रोजगार मिळवणे आवश्यक आहे. यासाठी शिवसेना व युवा सेनेच्या मदतीने महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी डोंबिवलीत एक दिवसीय कौशल्य देण्यात आले.डोंबिवली पपश्चिमेकडील श्रीधर म्हात्रे वाडी येथे आयोजित प्रशिक्षणासाठी डोंबिवली विधानसभा अधिकारी राहुल म्हात्रे यांनी पुढाकर घेतला आहे.
या कार्यक्रमात स्थायी समितीचे माजी सभापती जनार्दन म्हात्रे, माजी नगरसेविका गुलाब म्हात्रे, डोंबिवली विधानसभा अधिकारी राहुल म्हात्रे, प्रशिक्षक ज्योती परब, अँड प्रदिप बावस्कर, उपशहर संघटक अस्मिता खानविलकर, केतकी पवार, विभागप्रमुख उषा आचरेकर, प्रिती मुणगेकर, संजना राणे, प्रतिभा नारखेडे, सुनंदा रणसुभे, शारदा महाजन, गीता वेलकर, युवासेनेचे शहर समन्वय अधिकारी जाई ढोले,शितल कारंडे, पूजा शिंदे,वैष्णवी प्रभू. चंद्रकांत महाजन, तुषार शिंदे उपस्थित होते.
महिलांची आर्थिक परिस्थिती चांगली व्हावी,त्यांच्यात कौशल्य निर्माण व्हावे.याकरिता या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे यावेळी राहुल म्हात्रे सांगितले. टाकाऊ कपड्यापासून पायपुसणी बनविणे, संस्कार भारती रांगोळी, लोकरीचे तोळण आणि फुले बनविणे, जेष्ठ नागरिक रुग्णांना सेवा देणे, नोटांचा हार बनविणे.इत्यादी प्रशिक्षण देण्यात आले.प्रभागातील अनेक महिला या शिबिरात सहभागी झाल्या होत्या.

Post a Comment