Header AD

बिर्ला महाविद्यालयात मानसिक आरोग्यसेवा होणार सहज उपलब्ध

 

■नीरजा बिर्ला यांच्या हस्ते बी. के. बिर्ला कॉलेज येथील एमपॉवर सेलचे उद्घाटन....


कल्याण , कुणाल म्हात्रे  : बिट्स गोवा आणि पिलानी कॅम्पसमधे २०१८ आणि २०१९ मध्ये यशस्वीपणे एमपॉवर सेलची सुरुवात केल्यानंतर एमपॉवरच्या संस्थापिका आणि अध्यक्षा नीरजा बिर्ला यांनी आज ऑटोनॉमस बी. के. बिर्ला कॉलेजकल्याण येथे एमपॉवर सेलचे उद्घाटन केले.


या सेलतर्फे ११ हजार पेक्षा जास्त विद्यार्थी३००  पेक्षा जास्त शिक्षक सदस्य आणि बी. के. बिर्ला कॉलेजचे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांच्या गरजा पूर्ण केल्या जाणार आहेत. त्याशिवाय या सेलतर्फे ४ हजार पेक्षा जास्त विद्यार्थी आणि २५० शिक्षकबी. के. बिर्ला पब्लिक स्कूलचे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना सेवा दिली जाणार आहे. 


एमपॉवर सेलच्या सेवा सेंच्युरी रेयॉनसेंच्युरी रेयॉन हाय स्कूल आणि सेंच्युरी रेयॉन हॉस्पिटललाही दिल्या जाणार आहेत. हा उपक्रम मानसिक आरोग्याशी संबंधित दर्जेदार सेवा पुरवण्याच्या आणि कल्याण परिसरातील ७५ हजार लोकांना सहजपणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आला आहे. 

बिर्ला महाविद्यालयात मानसिक आरोग्यसेवा होणार सहज उपलब्ध बिर्ला महाविद्यालयात मानसिक आरोग्यसेवा होणार सहज उपलब्ध Reviewed by News1 Marathi on February 17, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads