Header AD

अनाधिकृत पाणी कनेक्शन घेणाऱ्यांवर पालिकेची "अब तक ५६" कारवाई


◆पाणीपुरवठा विभागाने केले कनेक्शन खंडीत....


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण पुर्वेकडे जाणाऱ्या मुख्य जलवाहिनी वरील  पाणी चोरी करणाऱ्या अनाधिकृत ५६ कनेक्शनवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने कारवाईचा  बडगा उचलित अनाधिकृत पाणी लाईन मगंळवारी खंडित केल्या.    

             

       पाणी चोरीला आळा बसण्यासाठी पालिका आयुक्त डाँ. विजय सूर्यवंशी  मार्गदर्शनाखाली अनाधिकृत पाणी कनेक्शनचा शोध  घेत त्या पाणी लाईन खंडित करण्याची मोहिम सुरू केली असुन  मगंळवारी कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी किल्ला परिसरातील नवीन ब्रीज  जवळील चिराग हाँटेल नजीक तसेच पत्रीपुला नजीक सर्वैदय सोसयटी मागे मुख्य जलवाहिनी वरील तब्बल ५६ अनाधिकृत पाणी कनेक्शन खंडित करण्याची धडक कारवाई पाणी पुरवठा  विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक आणि  त्यांच्या कर्मचारी पथकाने केली.


"पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कीकल्याण पुर्वेकडे जाणाऱ्या मुख्य पाणी पुरवठा जलवाहिनी वरील अनाधिकृत पाणी कनेक्शन वर कारवाई करीत ५६ अनधिकृत पाणी कनेक्शन खंडीत केली असुन या अनाधिकृत पाणी कनेक्शन घेणाऱ्यांची ओळख पटल्यास संबंधितावर पोलीस स्टेशनमध्ये पाणी चोरी संदर्भात गुन्हे दाखल करणार आहोत. या अनाधिकृत ५६ पाणी कनेक्शन खंडित केल्याने कल्याण पुर्वेकडे जाणारा पाणी पुरवठा सुरळीतपणे होण्यास मदत होईल.   

               

बुधवारी पाणी चोरी करणाऱ्या अनाधिकृत कनेक्शनचे शोध घेत ५६ अनाधिकृत पाणी कनेक्शन खंडित करणाच्या धडक कारवाईमुळे अनाधिकृत कनेक्शन घेत पाणी चोरी करणाऱ्या पाणी मफियांचे धाबे दणाणले आहे.


अनाधिकृत पाणी कनेक्शन घेणाऱ्यांवर पालिकेची "अब तक ५६" कारवाई अनाधिकृत पाणी कनेक्शन घेणाऱ्यांवर पालिकेची "अब तक ५६" कारवाई Reviewed by News1 Marathi on February 02, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads