Header AD

डोंबिवलीतील शिवसैनिक संदीप नाईक यांना नवरत्न पुरस्कार प्रदान

 डोंबिवली ( शंकर जाधव ) हिंदुहृद्यसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिलेल्या शिकवणीनुसार`२० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण`याचे पालन करत प्रत्येक शिवसैनिक काम करत असतात.अश्या शिवसैनिकांच्या समाजकार्याची दखल नेहमीच विविध सामाजिक संस्था घेत असतात. 


      डोंबिवलीतील शिवसैनिक संदीप नाईक यांच्या उल्लेखनीय कार्याची दाखल घेत हेल्पिंग हॅडस वेल्फेअर सोसायटी या संस्थेने नाईक यांना नवरत्न पुरस्कार प्रदान करून गौरविले.डोंबिवलीतील पूर्वेकडील आदित्य मंगल कार्यालयात पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यात वास्तूतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर,प्रसिद्ध मराठी कलाकार पंढरीनाथ कांबळीव हेल्पिंग हॅडस वेल्फेअर सोसायटी संस्थेचे अध्यक्ष समीर चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित केले.शाल ,श्रीफळ, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.महाराष्ट्रात सामाजिक कार्य करणाऱ्या  ९ समाजिक संस्थाना या सोहळ्यात पुरस्कार देण्यात आले.

डोंबिवलीतील शिवसैनिक संदीप नाईक यांना नवरत्न पुरस्कार प्रदान डोंबिवलीतील शिवसैनिक संदीप नाईक यांना नवरत्न पुरस्कार प्रदान Reviewed by News1 Marathi on February 22, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मुंब्रा बायपास रस्त्याला शिक्षण महर्षी कालसेकर यांचे नाव द्या शमीम खान

ठाणे (प्रतिनिधी)   मुंब्रा शहरातून बायपासच्या दिशेने जाणार्‍या रस्त्याला ए. आर. कालसेकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी गृहनिर्माण मंत्री ...

Post AD

home ads