Header AD

ठामपाची ५ बार व १ वाईन शॉपवर धाड नियम मोडणाऱ्यांवर दुसऱ्या दिवशीही कडक कारवाई
ठाणे , प्रतिनिधी  :  सोशल डिस्टन्सींग, मास्क आणि सॅनिटायजर वापराच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध महापालिकेच्या पथकाने सलग दुसऱ्या दिवशीही कारवाई करीत शहरातील ५ बार व १ वाईन शॉप सील केले. महापालिका आयुक्त डॅा.विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून शहरात कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरूच ठेवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.


          कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून नये, मास्क वापरण्यासोबत सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक करण्याचे तसेच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना तात्काळ सील करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले असून त्या पार्श्वभूमीवर प्रभाग समिती निहाय महापालिकेच्या पथकाद्वारे धाडी टाकून कारवाई करण्यात येत आहे.


       या कारवाईतंर्गत वागळे प्रभाग समितीमधील धमाल बार अँन्ड रेस्ट्रॉरंट सहाय्यक आयुक्त विजयकुमार जाधव यांनी सील केला. वर्तकनगर प्रभाग समितीतंर्गत सुरसंगीत बार अँन्ड रेस्ट्रॉरंट, स्वागत बार अँन्ड रेस्ट्रॉरंट आणि नक्षत्र बार अँन्ड रेस्ट्रॉरंट हे तीन बार आणि रेस्टॅारंटस सहाय्यक बाळासाहेब चव्हाण यांनी सील केले. मुंब्रा प्रभाग समिती मधील १ रेस्ट्रॉरंट सहाय्यक आयुक्त सागर सांळुंखे, तर लोकमान्य सावरकर प्रभाग समिती मधील पांडुरंग वाईन शॉप सहाय्य्क आयुक्त कल्पित पिंपळे यांनी सील केले. सदरच्या सर्व कारवाया अतिक्रमण व निष्कासन विभागाचे उपायुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या.

ठामपाची ५ बार व १ वाईन शॉपवर धाड नियम मोडणाऱ्यांवर दुसऱ्या दिवशीही कडक कारवाई ठामपाची ५ बार व १ वाईन शॉपवर धाड नियम मोडणाऱ्यांवर दुसऱ्या दिवशीही कडक कारवाई Reviewed by News1 Marathi on February 24, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads