Header AD

पालिका अधिकारी कर्मचारी यांनी सुभाष झळके यांच्या कामाचा आदर्श ठेवावा,माजी महापौर विलास पाटील यांचे उदगार


 


भिवंडी , प्रतिनिधी  : पालिकेत काम करताना सुभाष झळके यांच्या कामात प्रामाणिकपणा होता, चांगले काम करण्याची धमक होती. ज्या ज्या  विभागात त्यांनी काम केले त्या त्या सर्व विभागात त्यांनी कामाची छाप पाडली. सर्व कर्मचारी यांनी सुभाष झळके यांच्या कामाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करावे असे उदगार माजी महापौर यांनी विलास पाटील यांनी काढले.  


महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त सध्या प्राथमिक शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी म्हणून काम पाहणारे श्री सुभाष उर्फ नाना झळके 37 वर्ष सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झाले. त्यावेळी सेवा निवृत्तीच्या कार्यक्रमाच्या वेळी माजी महापौर विलास पाटील बोलत होते. महापालिकेत एकूण 37 वर्षे त्यांनी विविध विभागात सेवा केली. त्यांच्या सेवा निवृत्तीच्या निमित्ताने पालिकेच्या आयुक्त सभा दालनात सेवापुर्ती कार्यक्रमाचे माजी महापौर विलास पाटील यांच्या अध्क्षतेखालील एका सेवानिवृत्ती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी माजी महापौर विलास पाटील बोलत होते. 


यावेळी पालिका आयुक्त डॉक्टर पंकज आशिया, बोईसरचे आमदार राजेश पाटील, उपायुक्त  नूतन खाडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी किरण तायडे, मुख्य लेखा परिक्षक श्रीकांत अनारसे, बांधकाम लेखापरीक्षक काशिनाथ तायडे अन्य  सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी मोठ्या संख्येने तसेच झळके यांचे परिवार सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी माजी महापौर विलास पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सांगितले की सुभाष झळके यांनी विविध विभागात काम करून आपल्या कामाचा चांगल्याप्रकारे ठसा उमटवला. प्रशासकीय कामकाजाचा बरोबर त्यांनी  पालिकेचे विविध क्रीडा,नाट्य, गायन, कला पथक या क्षेत्रात देखील चांगले काम केले. तसेच  शहरात येणाऱ्या  कोणत्याही आपत्तीच्या वेळी सुभाष झळके हे त्या ठिकाणी धावून जात होते, ही त्यांची प्रमुख ओळख होती. 


पालिका आयुक्त यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की सुभाष झळके यांच्या कामाच्या पद्धतीचा आदर्श सर्व कर्मचाऱ्यांनी डोळ्यापुढे ठेवून काम करावे, आमदार राजेश पाटील यांनी सांगितले की सर्वांना मिळून मिसळून काम करून घेण्याची त्यांची खरी कला आहे, कोणतेही काम करताना कमीपणा नाही हा त्यांच्या मनाचा  मोठेपणा आहे. सर्वांना समान न्याय वागणूक देणं,  हा त्यांच्या वागणुकीचा मुख्य गुण आहे तर. सुभाष झळके यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, मी माझ्या आयुष्यात प्रामाणिकपणे, बेधडकपणे, कोणत्याही दबावाखाली काम केले नाही. प्रामाणिकपणे काम केले ते प्रामाणिकपणे काम केले. 


कोणत्याही दडपणाखाली, दबावाखाली  काम केले नाही. ज्या ज्या विभागात काम करण्याची संधी मिळाली, त्या ठिकाणी चांगले काम करण्याचा प्रयत्न केला. पालिकेचे कोणत्याही प्रकारे आर्थिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेतली.  वेळच्यावेळी काम पूर्ण करा, कार्यालयीन  कामामध्ये व घरामध्ये जितके अंतर ठेवता येईल, तेवढे अंतर ठेवा. घरातील मानसिक ताणतणाव याचा कार्यालयीन कामावर तर कार्यालयातील कामाचा मानसिक ताण तणाव घरात येता कामा नये, याची सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे.


आताचा काळ फार कठीण आहे, नोकरी करणे कठीण व  परिस्थिती बिकट आहे. अशावेळी  कर्मचाऱ्यानी संघटित व एकजूट असणे आवश्यक आहे. असे भावपूर्ण उद्गार झळके यांनी काढले. झळके यांचा शाल, श्रीफळ, पुष्गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.  


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले यांनी केले.  झळके यांच्याबरोबरच पालिकेचे लिपिक कर्मचारी मदन गायकवाड,आणि महानंद तरे, या निवृत  कर्मचारी यांचादेखील निरोप समारंभात सत्कार करण्यात आला. या वेळेला पालिकेच्या वतीने त्यांना भविष्य निर्वाह निधी देण्यात येणाऱ्या रक्कमेचा धनादेश धनादेश पत्र देण्यात आले.

पालिका अधिकारी कर्मचारी यांनी सुभाष झळके यांच्या कामाचा आदर्श ठेवावा,माजी महापौर विलास पाटील यांचे उदगार पालिका अधिकारी कर्मचारी यांनी सुभाष झळके यांच्या कामाचा आदर्श ठेवावा,माजी महापौर विलास पाटील यांचे उदगार Reviewed by News1 Marathi on February 28, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महापालिकेस लिंडे कंपनी कडून अतिरिक्त 15 टन ऑक्स‍िजनचा पुरवठा : महापौर नरेश म्हस्के

ठाणे  , प्रतिनिधी  :   गेल्या काही दिवसांपासून सर्वत्रच ऑक्स‍िजनचा पुरवठा अपुरा पडत होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांनी...

Post AD

home ads