Header AD

भिवंडीत पाणीपुरवठा करणाऱ्या वऱ्हाळ तलावावर हिरवा तरंग,दुर्गंधीमुळे नागरीक हैराण
भिवंडी  ,  प्रतिनिधी  :  भिवंडी शहरातील जुन्या नागरी वस्तीत नगरपरिषद असल्या पासून पाणी पुरवठा करणाऱ्या कामतघर येथील वऱ्हाळ तलावांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याने कपडे धुणे, वाहन धुणे हे नेहमीचे झाले असल्याने सध्या तलावातील पाण्यावर हिरवा तरंग पसरला असून या पाण्यामुळे दुर्गंधी सुटल्याने कामतघर परिसरातील नागरीक हैराण झाले आहेत.


या तलावातून जुन्या भिवंडी शहरातील मंडई, गौरी पाडा ,वाणी आळी, ब्राह्मण आळी ,सौदागर मोहल्ला ,तांडेल मोहल्ला या भागात दररोज २ एम एल टी पाणी पुरवठा केला जात असून या तलावातील विसर्जन घाटांची दुरवस्था झाल्याने या विसर्जन घाटा साठी अडविलेल्या पाण्यातील प्रदूषण सर्वदूर पाण्यात पसरल्याने ८ एकर क्षेत्रफळातील या तलावाच्या पाण्यावर हिरवा तेलकट तरंग साचले असल्याने त्याची दुर्गंधी सुध्दा येत आहे .या कडे महानगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी लक्ष केव्हा देणार असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात येत आहे .

 
या बाबत महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता संदीप पटनावर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पाण्याला दुर्गंधी येत असल्याचे काबुल करीत किनाऱ्यावरील घाटाच्या स्वच्छतेचे काम सुरू केले आहे परंतु लवकरच तराफा वरील पोकलन द्वारे तलावातील गाळ काढून स्वच्छता करण्यासाठीच प्रस्ताव तयार करण्यात येत असून त्यास मंजुरी मिळताच तलावांची स्वच्छता केली जाणार असल्याची माहिती देतानाच तलावात कपडे व वाहने धुण्यास मनाई करणारे फलक लावून दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा सुध्दा देण्यात आल्याचे स्पष्ट केले .
भिवंडीत पाणीपुरवठा करणाऱ्या वऱ्हाळ तलावावर हिरवा तरंग,दुर्गंधीमुळे नागरीक हैराण भिवंडीत पाणीपुरवठा करणाऱ्या वऱ्हाळ तलावावर हिरवा तरंग,दुर्गंधीमुळे नागरीक हैराण Reviewed by News1 Marathi on February 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads