Header AD

वंचितच्या कारवाई मुळे स्थानिक नागरिकांची दुर्गंधी पासून मुक्ती
पालघर,दि.६  : - वसई-विरार महानगर पालिके मार्फत विरार पूर्व कारगिल नगर या ठिकाणी रस्त्यालगत गटार दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. त्यावेळी निघालेला टाकाऊ कचरा याच ठिकाणी टाकण्यात आल्याने त्याचा त्रास स्थानिक नागरिकांना होत होता. याबाबत स्थानिक नागरिकांनी वारंवार पालिका अधिकाऱ्यांकडे तक्रार देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात होते.


त्यामुळे पालिकेच्या बेजबाबदार व कुचकामी असलेल्या अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीला कंटाळून नागरिकांनी वंचित बहुजन आघाडीचे युवा कार्यकर्ते सुविध पवार यांच्याकडे आपली कैफियत मांडली. पवार यांनी तात्काळ पालिकेच्या स्वछता विभागाचे निरीक्षक राहुल तुरकुटे यांना फोन करून तातडीने कचऱ्याची विल्हेवाट लावावी अन्यथा तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू असे सांगितल्यावर राहुल तुरकुटे यांनी तातडीने याची दखल घेतली. त्यानुसार पालिकेने सर्व कचरा उचलून साफ-सफाई केली. त्यामुळे  दुर्गंधीपासून  त्रस्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले.


आज महाराष्ट्र मधील परिस्थिती बघता असे दिसून येते कि कुठल्याही प्रकारची सामाजिक आपत्ती किंवा कुठला ही प्रसंग लोकांनवरती येतो तेव्हा वंचित बहुजन आघाडी त्यांना मदत करते. त्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करते. आज वंचित बहुजन आघाडीचा वाढता प्रभाव बघून प्रस्थापित  ही भीतीने शांत बसले आहेत.

वंचितच्या कारवाई मुळे स्थानिक नागरिकांची दुर्गंधी पासून मुक्ती वंचितच्या कारवाई मुळे स्थानिक नागरिकांची दुर्गंधी पासून मुक्ती Reviewed by News1 Marathi on February 06, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads