Header AD

उंबरली टेकडीवर आढळले ६ जखमी साप विकृतानी सापांना ठेचले असण्याची शक्यता
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  डोंबिवलीचे पक्षी अभयारण्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या उंबरली टेकडीवर सापांचा देखील मुक्त वावर असतो. सापांचा हा मुक्त वावर मात्र काही विकृतांच्या पचनी पडत नसल्याचं दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून या टेकडीवर विविध प्रजातीचे सहा ते सात साप हे जखमी व जर्जर अवस्थेत असल्याचे आढळून आले आहेत. 


कुणी तरी या सापांना जाणून बुजन मारल्याने त्यांच्या शरीरावर जखमा होत्या. सर्पमित्रांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तत्काळ टेकडीवर धाव घेत या जखमी सापांवर इलाज सुरू केला मात्र मोठ्या प्रमाणात जखमा असल्याने यातील तीन सापांचा मृत्यू झालाय तर उर्वरित सापांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान या टेकडीवरील  वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने वेळीच पाऊले उचलावीत अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जात आहे.


उंबरली टेकडीवर आढळले ६ जखमी साप विकृतानी सापांना ठेचले असण्याची शक्यता उंबरली टेकडीवर आढळले ६ जखमी  साप विकृतानी सापांना ठेचले असण्याची शक्यता Reviewed by News1 Marathi on February 06, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads