Header AD

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्या साठी विशेष उपाय योजना, नागरिकांनी कोरोना त्रिसूत्री नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे आयुक्त डॉ.पंकज आशिया,





भिवंडी , प्रतिनिधी  :  भिवंडीच्या आजूबाजूच्या परिसरात कोरोना  रुग्णांची संख्या वाढत असल्याने, भिवंडी शहरात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेकामी महापालिका आयुक्त डॉ.पंकज आशिया यांनी तातडीने भिवंडी पोलीस विभाग व पालिका अधिकारी यांची सयुंकत  विशेष बैठक बोलावली होती.या बैठकीस भिवंडी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण, पालिका अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, वैद्यकीय अधिकारी डॉ.कारभारी खरात, जागतिक आरोग्य संघटनेचे भिवंडी प्रतिनिधी डॉ.किशोर चव्हाण, सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, सर्व प्रभाग अधिकारी उपस्थित होते. 


शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना शहरात सुरू करण्यात येत आहेत, त्या अनुषंगाने विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणे, या कामी पालिका व पोलीस विभाग यांचे सयुंकत पथक काम करेल.हे पथक मास्क न वापरणारे यांच्या विरोधात कारवाई करेल. अशा व्यक्तींकडून 200 रुपये दंड वसूल करेल.तसेच  पालिका  कार्यक्षेत्रामध्ये असलेल्या मंगल कार्यालयांमध्ये लग्नसमारंभासाठी महानगरपालिका व पोलीस यांची परवानगी देण्यात आली आहे किंवा नाही याची देखील तपासणी हे.पथक करणार आहे.


 रीतसर  परवानगी नसल्यास फौजदारी स्वरूपाची कारवाई देखील करण्यात येणार आहे, महापालिका क्षेत्रात रस्त्यावर बसणाऱ्या फेरीवाले यांच्याकडून योग्य ते सामासिक अंतर (सोशल डिस्टंसिंग) चे पालन करीत नसेल तर अशा फेरीवाल्यांवर दोनशे रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई,   मार्केट परिसर असलेल्या सर्व दुकानदार दुकानाचे मालक सामासिक अंतर (सोशल डिस्टंसिंग) का पालन करत नसतील तर अशा दुकानांवर पाचशे रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. 


सर्व मोठ्या आस्थापना जसे मंगल कार्यालय, हॉल जिमखाना हॉटेल, रेस्टॉरंट, चित्रपट गृह, धार्मिक स्थळे, बाजारपेठा, क्रीडांगणे , भाजी मार्केट परिसर, राजकीय पक्ष मेळावे, खाजगी शिकवणी वर्ग, तसेच शहरातील सार्वजनिक ठिकाणे अशा सर्व ठिकाणी मासकचा वापर, सामासिक अंतर,  याचे पालन होत नसेल तर अशा आस्थापनांवर रुपये पाच हजार प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. 


शहरात येणाऱ्या शेअरिंग द्वारे रिक्षा,  प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे अशा वेळी एका रिक्षा यामध्ये रिक्षाचालक व्यतिरिक्त दोन पेक्षा जास्त प्रवास करत असल्यास संबंधित रिक्षाचालकाकडून पाचशे रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस गाड्या या नियमांचे पालन करणार नसेल तर त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल. 


शहरातील  वैद्यकीय सेवा देणाऱ्या खासगी दवाखान्यांमध्ये वैद्यकीय अधिकारी किंवा त्यांच्या दवाखान्यात येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांचे मास्क,सामासिक अंतर पालन करीत नसतील तर अशा  खाजगी डॉक्टरांकडून पाचशे रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येणार, उपरोक्त नमूद महापालिकेच्या कार्यक्षेत्रात सामासिक अंतर, मास्कचा वापर याशिवाय लग्नसमारंभासाठी तसेच सर्व आस्थापनासाठी शासनाने निर्धारित केलेल्या नियमांचे  पालन होत नसल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई, तसेच साथ रोग प्रतिबंधात्मक नियमानुसार .कारवाई करण्यात येईल. 


जर नियमांचे पालन होणार नसेल तर तसेच सदर अस्थापना बंद करण्यासंदर्भात कड्क उपाययोजना करण्यात येतील तरी कारोना बाबत त्रिसूत्री मासक्चा वापर, सामासिक अंतर, हात धुणे, sanitizer  वापर इत्यादी तंतोतंत पालन करून, कारोनावर मात करावयाची आहे,याकामी सर्व  नागरिकांनी  पालिका व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पालिका आयुक्त डॉक्टर पंकज आशिया, पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी सयुंकतपणे केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्या साठी विशेष उपाय योजना, नागरिकांनी कोरोना त्रिसूत्री नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे आयुक्त डॉ.पंकज आशिया, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्या साठी विशेष उपाय योजना, नागरिकांनी कोरोना त्रिसूत्री नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे आयुक्त डॉ.पंकज आशिया, Reviewed by News1 Marathi on February 24, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महापालिकेस लिंडे कंपनी कडून अतिरिक्त 15 टन ऑक्स‍िजनचा पुरवठा : महापौर नरेश म्हस्के

ठाणे  , प्रतिनिधी  :   गेल्या काही दिवसांपासून सर्वत्रच ऑक्स‍िजनचा पुरवठा अपुरा पडत होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांनी...

Post AD

home ads