भिवंडी :दि. २६ (प्रतिनिधी ) भिवंडी तालुक्यातील चौधरपाडा शिवनगर येथे नुकताच पार पडलेल्या ठाणे जिल्हा चाचणी कुस्ती स्पर्धेत कोनगाव येथील कलानिकेतन व्यायामशाळेतील कुस्तीगीरांनी विविध वजनी गटात ११ प्रथम तर ६ द्वितीय क्रमांक मिळवीत जिल्ह्याचे सांघिक विजेतेपद पटकाविले आहे .२३ फेब्रुवारी रोजी ठाणे जिल्हा तालीम संघाच्या मान्यतेने जय हनुमान तालीम संघ चौधरपाडा व वीर बजरंग क्रीडा मंडळ सोनाळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या निवड चाचणी स्पर्धेत जिल्ह्यातून अनेक उदयोन्मुख कुस्तीगीर या चाचणी स्पर्धेत सहभागी झाले होते.
त्यामध्ये प्रा .विनोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली कलानिकेतन व्यायामशाळेच्या तालमीत कुस्तीगीरांनी यशस्वी कामगिरी केल्याने त्या सर्वांचा कोनगाव या ठिकाणी सरपंच डॉ रुपाली कराळे यांच्या शुभहस्ते उपसरपंच कृतिका प्रमोद पाटील,कल्याण डोंबिवली महानगरपालिका नगरसेवक वरुण पाटील ,ठाणे जिल्हा तालीम संघ अध्यक्ष सुरेश पाटील , भिवंडी तालुका कुस्ती संघटना अध्यक्ष श्रीधर काथोड पाटील, ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते .
जिल्हा निवड चाचणीत निवड झालेल्या कुस्तीगि रांना पुणे बालेवाडी येथे होणाऱ्या ६५ व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार असल्याने त्यांना ट्रॅक सूट भेट देण्यात आले तर नगरसेवक वरूण पाटील यांनी कलनिकेतन व्ययामशाळेस आंतरराष्ट्रीय दर्जाचे मॅट देण्याचे जाहीर केले सरपंच डॉ रुपाली कराळे यांनी
कलानिकेतन व्यायामशाळेचा महाराष्ट्र चॅम्पियन कुस्तीगीर सागर काळूराम भोईर हा निराधार असतानाही कुस्ती खेळाशी प्रामाणिक आहे, निराधार असूनही कुस्तीची परंपरा जपून आपला आणि गावाचा लौकिक वाढवीत असल्याने त्याच्या कायमस्वरूपी उदरनिर्वाहाची (नोकरीची) सोय करणार असल्याचे जाहीर केले.तर मान्यवरांचे स्वागत व आभार मंडळाचे अध्यक्ष प्रा.विनोद हनुमान पाटील यांनी मानले.
Post a Comment