Header AD

शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी सारा फाऊंडेशने भिवंडी मनपात दिले निवेदन.





भिवंडी ,  प्रतिनिधी   :  भिवंडी पालिकेच्या शिक्षकांना सुधारित वेतन श्रेणी नुसार सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा या मागणीसाठी आज दुपारी ठाण्याच्या सारा फाउंडेशन व शिक्षकांचावतीने महापालिका आयुक्त व महापौर यांना लेखी निवेदन देण्यात आले भिवंडी पालिकेचे प्राथमिक शिक्षक व शिक्षिकांनी पालिकेत येऊन घोषणाबाजी केली.सातवा वेतन तातडीने लागू करण्यात यावा यासाठी पालिका आयुक्त व महापौर यांच्या नावे असलेले निवेदन उपायुक्त शिक्षण विभाग नूतन खाडे यांना देण्यात आले.राज्यातील बहुतांश महापालिकांना सातवा वेतन आयोग सुधारित वेतन श्रेणी नुसार लागू करण्यात आला आहे मात्र भिवंडीतील शिक्षकांना सातवा वेतन आयोग अद्याप लागू करण्यात आलेला नाही राज्य शासनातर्फे सातवा वेतन आयोग लागू करून 50 % टक्के हिस्सा भिवंडी पालिकेच्या शिक्षण विभागाच्या खात्यावर जमा झाला आहे सुमारे साडेसात कोटी रुपये ही रक्कम आहे. 


महापालिकेने ५० टक्के हिस्सा देऊन सन २०१९ पासून सातवा वेतन आयोग लागू करणे अपेक्षित होते मात्र तो अद्याप लागू केलेला नाही महापालिकेच्या शिक्षकांसाठी वेतनश्रेणी बाबतीत कोणताही ठराव घेणे बंधनकारक नसून पालिकेने तातडीने सातवा वेतन आयोग लागू करावा महासभेत सातवा वेतन आयोग लागू करणे बाबत तातडीने ठराव मंजूर करून १८ महिन्याच्या थकबाकी सह सातवा वेतन आयोग लागू करावा अशी मागणी ही सारा फाऊंडेशनच्या अध्यक्ष सारंगी महाजन यांनी केली  यावेळी शिक्षक संघटनेचे असलम खान गणेश धुमाळ योगेश पाटील शेख जियाऊ, स्वाती भोईर रूपाली पाटील अदि पदाधिकारी उपस्थित होते.
शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी सारा फाऊंडेशने भिवंडी मनपात दिले निवेदन. शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी सारा फाऊंडेशने भिवंडी मनपात दिले निवेदन. Reviewed by News1 Marathi on February 09, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads