Header AD

दहाव्या दिवशीही एनआरसी कामगारांचे धरणे आंदोलन सुरूच पाण्याच्या लाईन खंडीत केल्याचा व्हिडीओ वायरल
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  मोहने येथील एन.आर.सी कामगारांचा प्रश्‍न शासन दरबारी पोहोचवा याकरिता कामगार व महिलावर्ग ठिय्या आंदोलन दहा दिवस झाले तरी सुरूच आहे. एनआरसी काँलनीत रिकाम्या बिल्डिंग, बंगले पाडकाम आदाणीने सुरू ठेवले असल्याने जो पर्यंत कामगारांची थकित देणी मिळत नाही. तो पर्यंत कामगार आदोलंन सुरू ठेवत पाडकामास विरोध करीत आहेत.


कामगारांनी लोकशाही मार्गाने सुरू केलेल्या आंदोलनास पोलीसांमार्फत दडपशाही करण्याचा प्रकार घडत आसल्याचा आरोप आंदोलनकर्ते कामगार करीत असुन सोमवारी कामगार वसाहतीतील आरएस परिसरात बिल्डिंग पाडकाम करीत असताना पाण्याच्या लाईन बाधित करण्याचा तसेच वीज लाईन सुरू असताना पाडकाम करण्याबाबतचा व्हिडिओ वायरल झाला असून निष्काळजीपणे पाडकाम करत असल्याने यामध्ये दुर्घटना घडुन कोणाचा जीव गेल्यास जबाबदार कोण असा सवाल कामगार करीत असल्याचे आयटक युनियन चे कामगार प्रतिनिधी अर्जुन पाटील यांनी सांगितले. तसेच जो पर्यंत ठोस निर्णय कामगारांच्या देण्याबाबत मिळत नाही तो पर्यंत कामगारांचे आंदोलन सुरू राहणार आहे.

दहाव्या दिवशीही एनआरसी कामगारांचे धरणे आंदोलन सुरूच पाण्याच्या लाईन खंडीत केल्याचा व्हिडीओ वायरल दहाव्या दिवशीही एनआरसी कामगारांचे धरणे आंदोलन सुरूच पाण्याच्या लाईन खंडीत केल्याचा व्हिडीओ वायरल Reviewed by News1 Marathi on February 22, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खासदार कपिल पाटील यांच्या ताफ्यातील गाडी पेटली आगीत गाडी जळून खाक

कल्याण , प्रतिनिधी  :  भिवंडी  लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार कपिल पाटील शनिवारी  कार्यक्रमानिमित्त कल्याण शहाड येथे आले होते .त्यांच्या ...

Post AD

home ads