Header AD

शिवसेनेच्या "सखींनो खेळात जीव रंगला" मध्ये बक्षीसांची लयलूट

 



कल्याण ,  कुणाल  म्हात्रे  :  शिवसेनेच्या माध्यमातून प्र.क्र.११ बल्याणी प्रभागात हळदी कुंकू समारंभास महिला वर्गाचा प्रचंड प्रतिसाद  लाभला. प्रभाग क्रमांक ११ बल्याणी प्रभागात कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मयूर पाटील,  शिवसेनेच्या  शिक्षण मंडळ सभापती, नगरसेविका  नमिता पाटील  यांनी महिलांकरिता  बल्याणी भव्य हळदी कुंकू सोहळा आयोजित केला होता. सदर सोहळ्यात महिलांकरिता एल सी डी टीव्ही, फ्रीज, वाँशिंग मशिन २२ पैठणी व  आकर्षक साड्या बक्षीस स्वरूपात ठेवण्यात आल्या होत्या.  

 
जितेंद्र करंजेकर उर्फ (जितू दादा) मराठी कलाकार यांनी "सखींनो  खेळात जीव रंगला"या महिलांसाठी घेतलेल्या खेळात  महिलांनी सहभाग घेत खेळाचा मनमुराद आनंद घेत. बक्षिसांची लयलुट केली. महिला साठी आयोजित या खेळामध्ये कालाकार जितेंद्र करंजेकर यांनी खेळाच्या माध्यमातून आपला महाराष्ट्र, आपली संस्कृती, आपली भाषा , आपली परंपरा यांचा मेळ घालत महिलावर्गाला खेळवुन ठेवले. याप्रसंगी सिनेतारका सोनाली कुलकर्णी यांची उपस्थिती आकर्षणांचा विषय ठरली.


कृषी  उत्पन्न बाजार समिती कल्याण संचालक मयुर पाटील, शिक्षण मंडळ सभापती नमिता  पाटील दरवर्षी प्रभागातील महिलासाठी हळदी कंकू समारंभाचे आयोजन करतात. प्रभागातील मुलभुत सुविधा ,पायाभुत सुविधा ही कामे मार्गी लावित  प्रभागाचा विकास, आडी,आडीचणीला तळागाळातील लोकांच्या मदतीला जाण्याचा वसा कायम सुरू असुन यंदा कोरोना पार्श्वभूमीवर लाँक डाऊन शिथेलतामुळे महिलावर्गाला दिलासा देत खेळाचा आनंद लुटण्यासाठी क्षणभर हास्य , मनोरंजन, यांची पर्वणी यानिमित्ताने उपलब्ध करून दिली.



या प्रसंगी  शिवसेना च्या ठाणे जिल्हा परिषद अध्यक्षा सुषमा लोणे, शिवसेना महिला आघाडी संघटक विजया पोटे, नगरसेविका वैषाली भोईर, आदीसह अनेक मान्यवर उपस्थितीत होते. याप्रसंगी प्रथम परितोषिक  एल.सी.डी टिव्ही प्रिती यादव यांनी, द्वितीय पारितोषिक फ्रीज तेजस्वी देसले यांनी  तर वाँशिंग मशिन हे तिसरे परितोषिक पमा गोंधळे यांनी लकी ड्राँ मध्ये जिकंले.
शिवसेनेच्या "सखींनो खेळात जीव रंगला" मध्ये बक्षीसांची लयलूट शिवसेनेच्या "सखींनो खेळात जीव रंगला" मध्ये बक्षीसांची  लयलूट Reviewed by News1 Marathi on February 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads