Header AD

डोंबिवली तील विना मास्क नागरिकांवर पालिका प्रशासन आणि वाहतूक पोलीसांची संयुक्त कारवाई
डोंबिवली ( शंकर जाधव ) कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पालिका प्रशासनाकडून विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर तर विना मास्क वाहन चालविणाऱ्यांवर सोमवारी सायंकाळी पालिका प्रशासन आणि वाहतूक पोलीसांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाईत अनेक नागरिक व वाहनचालक विनामास्क फिरत असल्याचे दिसून आले.तर डोंबिवलीतील प्रसिद्ध चिमणी गल्लीतील भाजीमार्केटमध्ये काही फेरीवाल्यांनी तोंडावर मास्क घातले नसल्याने त्यांच्यावर कारवाई झाली .


          पालिका प्रशासन आणि वाहतूक पोलीसांनी डोंबिवली स्टेशनपरिसरातील कामत मेडिकलपासून चिमणी गल्ली,फडके रोड, नेहमी रोड आणि पुन्हा स्टेशन परिसरात कारवाई केली.विनामास्क फिरणारे नागरीक, फेरीवाले आणि वाहनचालकांवर या कारवाईत दंड वसूल करण्यात आला. पालिकेच्या`फ`प्रभाग क्षेत्र हद्दीत प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत व पथक तर डोंबिवली वाहतूक नियंत्रण शाखेच्या वपोनि राजश्री शिंदे व वाहतूक पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत पालिकेने विनामास्क फिरणारे २३ तर विनामास्क वाहनचालविणारे ४० वाहनचालक असे एकूण ४० जणांकडून १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.


         पकडण्यात आलेल्या विनामास्क नागरिकांपैकी चार ते पाच नागरिकांनी दंड भरला नाही म्हणून त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले.तसेच काही नागरिकांनी पालिका कर्मचाऱ्यांशी वाद घालत हुज्जत घातली. काही ज्येष्ठ नागरिकांनी कर्मचाऱ्यांनी मास्क तोंडावर घेण्याची विनंती केली.फडके रोडवर एका दुचाकीवर वाहनचालकाने मास्क घातले नसल्याने त्याला वाहतूक पोलिसांनी थांबविल्याचा प्रयत्न केला असता त्याने पळून जाण्याच्या प्रयत्न केला, मात्र समोरच वाहतूक पोलीस उभे असल्याने त्याचा हा प्रयत्न फसला.काही फेरीवाल्यांवर पालिकेने कारवाई केली.पालिका प्रशासन आणि वाहतूक पोलीसांच्या या कारवाईमुळे स्टेशनपरिसरात नागरिकांनी  चालताना पालिका आणि प्रशासनाचे आभार मानले.

डोंबिवली तील विना मास्क नागरिकांवर पालिका प्रशासन आणि वाहतूक पोलीसांची संयुक्त कारवाई डोंबिवली तील विना मास्क नागरिकांवर पालिका प्रशासन आणि वाहतूक पोलीसांची संयुक्त कारवाई Reviewed by News1 Marathi on February 23, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मनविसेच्या विधान सभा शहरअध्यक्ष पदी मिलिंद म्हात्रे

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  मनविसेचे सागर जेधे यांनी मनविसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर मनसेचे जुने कार्यकर्ते मिलींद म...

Post AD

home ads