वॉर रेस्क्यू टिमचे "साहसी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर"
कल्याण, कुणाल म्हात्रे : वाईल्ड ॲनिमल ॲण्ड रेप्टाईल रेस्क्यू फाउंडेशनच्या वतीने दोन दिवसीय "साहसी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराचे आयोजन शहापुर येथील माहुली किल्ल्याच्या पायथ्याजवळ ३० व ३१ जानेवारी रोजी करण्यात आले होते. या शिबीरात रोप, हारनेस, कॅराबिनर, जुमार व इतर साहित्याच्या आधारे कडा चढणे, उतरणे, सर्व प्रकारच्या नॉट, अवकाश दर्शन, जंगल ओळख, पक्षी निरीक्षण व इतर प्रशिक्षण गिर्यारोहक तज्ञ राम वाहालकर यांनी दिले.
२०१९ चा महापुर परिस्थिती, आग लागल्याची घटना, लिफ्ट बंद पडून माणसे अडकली, कुठे साप घरात आला तर कुठे पक्षी मांज्यामध्ये अडकला, कुठे विहरीत कुत्रा पडला तर कुठे मांजर बाल्कनीत अडकले आहे एवढंच नव्हे तर माळशेज घाट व इतर ठिकाणी अपघात होऊन दरीतून जिवंत अथवा मृत माणसे बाहेर काढणे अशा सर्व प्रकारचे कार्य वॉर रेस्क्यू टिमच्या शिघ्र बचाव दलाचे स्वयंसेवक करत असतात.
कोरोना काळातील आपत्कालीन परिस्थितीत ही वॉर रेस्क्यू टिम ने सॅनिटायझर फवारणी, अन्नधान्य वाटप, परराज्यातील नागरिकांना ई पास काढून देणे असे कार्य करत होती. लॉकडाऊन व इतर प्रकारच्या आपत्कालीन नैराश्याने खचून न जाता स्वतःला सर्व प्रकारच्या परिस्थितीत टिकून राहीले पाहिजे. या करिता वॉर रेस्क्यू टिमने साहसी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर आयोजित केले असल्याची माहित संस्थेचे अध्यक्ष योगेश कांबळे यांनी दिली. या संस्थेचे स्वयंसेवक/ कार्यकर्ता म्हणून सहभागी व्हायचे असल्यास 9869343535/8850585854 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment