Header AD

कल्याण डोंबिवलीत १७८ रुग्ण तर दोन मृत्यू



कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज १७८ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत १२४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज दोन जणांचा मृत्यू झाला आहे.



आजच्या या १७८  रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ६३,११८  झाली आहे. यामध्ये १६४६ रुग्ण उपचार घेत असून ६०,३०३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ११६९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १७८  रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१६,  कल्याण प – ४६, डोंबिवली पूर्व –७५ , डोंबिवली प – ३६, मांडा टिटवाळा  येथील ५ रुग्णांचा समावेश आहे.
कल्याण डोंबिवलीत १७८ रुग्ण तर दोन मृत्यू कल्याण डोंबिवलीत १७८ रुग्ण तर दोन मृत्यू Reviewed by News1 Marathi on February 28, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महानगरपालिका उभारणार प्राणवायू प्रकल्प २० टन प्राणवायू क्षमतेचे प्रकल्प ३० एप्रिल पर्यंत होणार कार्यान्वित

ठाणे , प्रतिनिधी ;  प्राणवायूचा होणारा मर्यादित पुरवठा आणि त्यामुळे होणारी रूग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने प्राणवायू निर्मा...

Post AD

home ads