Header AD

७वर्षापासून फरार आरोपीला विष्णू नगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या..

 डोंबिवली ( शंकर जाधव ) तिघा आरोपींनी  दारूच्या नशेत घरात घुसून रुपेश मधुकर रणपिसे यांना मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली होती.या गुन्ह्याची नोंद विष्णूनगर पोलीस ठाण्यात झाल्यावर पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली.मात्र तिसरा आरोपी फरार झाल्याने त्याचा पोलीस कसून शोध घेत होते.७ वर्षापासून फरार झालेला आरोपी डोंबिवलीत येणार असल्याचे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या. 


पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार,सात वर्षापासून फरार झालेल्या आरोपीचे नाव  तुषार रणपिसे नाव असून सतीश रणपिसे आणि परेश जोशी यांना सात वर्षापूर्वी अटक केली होती.१५ सप्टेंबर २०१४ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास संखेश्वर पाल्मच्या गेटसमोर चाळ क्र.३, कुंभारखानपाडा, डोंबिवली ( पश्चिम ) येथे फिर्यादी रुपेश मधुकर रणपिसे त्यांचे नातेवाईकांच्या घरी जेवत होते. त्यावेळी आरोपी सतीश रणपिसे,तुषार रणपिसे आणि परेश जोशी हे दारूच्या नशेत आर्थिक व्यवहारावरून रुपेश रणपिसे यांना सतीश रणपिसे याने डोक्यात फावडा मारला.तर आरोपी तुषार रणपिसे याने फिर्यादीला लोखंडी सळईने मारहाण केली तर परेश जोशी याने रुपेश  रणपिसे हाताबुक्क्याने मारहाण केली.


यात रुपेश रणपिसे गंभीर जखमी झाले. रुपेश  रणपिसे यांनी तीघाविरोधात विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.पोलिसांनी सतीश रणपिसे आणि परेश जोशी या दोघांना अटक केली.न्यायालयाने या दोन आरोपीची जामिनावर मुक्त केले होती.यातील फरार आरोपी तुषार रणपिसे याचा विष्णूनगर पोलीस शोध घेत होते.  आरोपी तुषार रणपिसे ( २६ ) याला डोंबिवली पूर्वेकडील रिजन्सी पार्कच्या पाठीमागील दावडी गावात येत असल्याची माहिती मिळाली होती.वपोनी संजय साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वडणे,पो.नाईक कुरणे,पो.काॅ.कुंदन भामरे,मनोज बडगुजर या पथकाने सदर ठिकाणी सापळ रचून अटक केली.

७वर्षापासून फरार आरोपीला विष्णू नगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या.. ७वर्षापासून फरार आरोपीला विष्णू नगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या.. Reviewed by News1 Marathi on February 17, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads