विज बिलां बाबत भाजपचे महावितरण समोर आंदोलन
ठाणे, प्रतिनिधी : वाढीव वीज बिलाविरोधात राज्यात भाजप चे ठिकठिकाणी आंदोलन सुरु असतांना ठाणे भाजप आक्रमक होतांना दिसली. ठाण्यातील वागळे इस्टेट भागातील महावितरण कार्यालयाबाहेर भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलन कर्त्यांनी यावेळी ठाकरे सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
भाजप आमदार संजय केळकर,आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महावितरण कार्यालयाला भाजप कार्यकर्त्यांकडून टाळे ठोकण्याचा प्रयत्न करतांना ठाणे पोलिसांकडून भाजप कार्यकर्त्यांना रोखण्यात आले यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये काहीकाळ धक्काबुक्की पाहायला मिळाली. तर ठाणे पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात यावेळी ताब्यात घेतलं.

Post a Comment