विविध मागण्यांसाठी मनसे आमदार राजू पाटील यांनी घेतली आयुक्तांची भेट
कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील विविध मागण्यांसाठी मनसे आमदार राजू पाटील यांनी आज पालिका आयुक्तांची भेट घेतली.
डोंबिवली (पूर्व) नांदिवली येथील स्वामी समर्थ मठ येथील रस्त्याचे काम तत्काळ सुरु करावे, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेला गती देण्यासाठी संयुक्त बैठक आयोजित करावी, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका विकास आराखडा अंतर्गत बाह्यवळण रस्ता रुंदीकरण प्रकल्पांत बाधित होणाऱ्या रहिवाशांचे पुनर्वसन करावे, महानगरपालिका क्षेत्रातील थकीत मालमत्ता करावर आकारलेल्या शास्तीच्या रकमेवर ठाणे महानगरपालिके प्रमाणे १०० टक्के सूट द्यावी आणि डोंबिवली औद्योगिक विभागासह नऊ गावांतील मालमत्ता कराची सुधारीत बिले तत्काळ वितरीत करावी अशी मागणी करत याबाबत पत्रसुद्धा आयुक्तांना दिले.
आयुक्तांनी या मागण्या मान्य करत सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांच्यासमवेत मनसे जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर, जिल्हा संघटक हर्षद पाटील आणि डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत उपस्थित होते.

Post a Comment