मोहने रोड येथे संतप्त एनआरसी कामगारांचा रस्ता रोको
कल्याण , कुणाल म्हात्रे : गेल्यातीन दिवसांपासून एनआरसी व्यवस्थापाने एनआरसी काँलनीतील एनआरसी शाळेलगतच्या परिसरातील रिकामे बंगले जेसीबीच्या सहाय्याने पाडण्याचे काम सुरू करण्यात आले असुन रिकाम्या बिल्डिंग पाडण्यास सुरूवात होणार असल्याने संतप्त एनआरसी कामगार व वसाहतीतील कामगार कुटुंबातील महिला वर्गाने गुरुवारी संध्याकाळी मोहने रोड येथे रस्ता रोको केला.
कल्याण जवळील आंबिवली मोहने येथील एनआरसी कंपनी गेले तेरा वर्ष बंद पडलेली आहे. यामुळे सुमारे ३५०० कामगारांना बेकार झाले. कामगारांची थकीत देणीबाबत कामगार युनियनच्या माध्यमातून न्यायलीन लढाई सुरू आहे. आपली हक्काची थकीत देणी मिळतील या प्रतिक्षेत काँलनी मध्ये आज देखील कामगार राहत असुन सदर कंपनी ही सुमारे १३ वर्षापूर्वी बंद पडली होती. या कंपनीची जागेची किंमत आज कोरोडोच्या घरात आहे. कामगारांची देणी बाकी आहेत. त्यामुळे हे कामगार येथील घरे सोडण्यास तयार नाहीत.
आमची थकीत देणी बाबत ठोस निर्णय मिळेपर्यंत कामगार वसाहततील रिकामे बंगले रिकाम्या बिल्डिंग पाड काम करू नये अशी भुमिका रस्ता रोको दरम्यान घेतली असल्याचे कामगारांनी सांगितले. या रस्ता रोकोवेळी घटनास्थळी पोलिसांचा फौज फाटा उपस्थित होता.

Post a Comment