Header AD

कल्याण डोंबिवलीत १११नवे रुग्ण"◆६१,११६ एकूण रुग्ण तर ११४९ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ७९ रुग्णांना डिस्चार्ज...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात  आज नव्या १११ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ७९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एकही मृत्यू झाला नाही.   
आजच्या या १११ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ६१,११६ झाली आहे. यामध्ये ७९७  रुग्ण उपचार घेत असून ५९,१७०  रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


तर आतापर्यत ११४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १११ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१८, कल्याण प – ४९, डोंबिवली पूर्व – २२,  डोंबिवली प-२०, मांडा टिटवाळा येथील २ रुग्णांचा समावेश आहे. डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ३ रुग्ण टाटा आमंत्रा येथून, ४ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, १ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटर मधून तर ७ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.
कल्याण डोंबिवलीत १११नवे रुग्ण  कल्याण डोंबिवलीत १११नवे रुग्ण Reviewed by News1 Marathi on February 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मनविसेच्या विधान सभा शहरअध्यक्ष पदी मिलिंद म्हात्रे

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  मनविसेचे सागर जेधे यांनी मनविसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर मनसेचे जुने कार्यकर्ते मिलींद म...

Post AD

home ads