उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी नदीपात्रात आंदोलन सुरु
◆नदी स्वच्छ होईर्पयत आंदोलन सुरु राहणार मी कल्याणकर या समाजिक संस्थेचा पुढाकार....
कल्याण , कुणाल म्हात्रे : लाखो नागरीकांची तहान भागविणारी उल्हास नदी प्रदूषित झाली असून नाल्याचे सांडपाणी आणि जलपर्णीमुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हि नदी वाचविण्यासाठी मी कल्याणकर या समाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. संस्थेचे अध्यक्ष माजी नगरसेवक नितीन निकम हे नदी पात्रत आंदोलनास बसले आहे. जोर्पयत नदी स्वच्छ केली जात नाही. तोर्पयत हे आंदोलन सुरुच राहणार असल्याची भूमिका निकम यांनी घेतली आहे.
उल्हास नदी ही बारमाही नदी आहे. ही नदी कजर्त पासून कल्याण मोहने बंधा:यार्पयत प्रदूषित आहे. या नदीच्या पात्रत प्रक्रिया न करता सांडपाणी सोडले जात आहे. त्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. नदी प्रदूषित झाल्याने सांडपाण्यामुळे नदीच्या पात्रत जलपर्णी साचली आहे. ही जलपर्णी पाणी शोषत असून या पाण्याला घाण वास मारतो. नदी पात्रत मोहने, गाळेगाव आणि म्हारळ येथील नाल्याचे सांडपाणी सोडले जात आहे. हे नाले बंद करण्यात यावे. नदीचे प्रदूषण राखले जावे यासाठी मी कल्याणकर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम यांनी आजपासून नदीपात्र आंदोलन सुरु केले आहे.
नदी प्रदूषण रोखले जात नाही. तोर्पयत हे आंदोलन सुरु राहणार आहे. यापूर्वी दोन वेळा नदी पात्रत निकम यांनी आंदोलन केले होते. एकदा पालकमंत्री एकनाथ शिंदे तर दुसऱ्या वेळेस मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांचे उपोषण सोडविले होते. मात्र आत्ता जोर्पयत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नाही. तोर्पयत माघार घेतली जाणार नसल्याचे निकम यांनी सांगितले.

Post a Comment