Header AD

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडली शंभरी १०२ नवे रुग्ण, एक मृत्यू


◆६०,७८३ एकूण रुग्ण तर ११४८ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ५८ रुग्णांना डिस्चार्ज....


कल्याण ,  कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येने शंभरी ओलांडली असून गेले कित्येक दिवस कोरोना रुग्णांची संख्या दोन आकडी येत होती मात्र आज हा आकडा शंभरच्या पुढे गेल्याने कल्याण डोंबिवलीकरांची चिंता काही प्रमणात वाढली आहे.

 


आज नव्या १०२ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ५८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एका मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.   


 

 आजच्या या १०२ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ६०,७८३ झाली आहे. यामध्ये ७३८ रुग्ण उपचार घेत असून ५८,८९७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

तर आतापर्यत ११४८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १०२ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-कल्याण प – ३७डोंबिवली पूर्व – ४१ डोंबिवली प-१०मांडा टिटवाळा- ८तर मोहना येथील १ रुग्णाचा समावेश आहे. 

    


 डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १ रुग्ण टाटा आमंत्रा येथून३ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटर मधून तर ३ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडली शंभरी १०२ नवे रुग्ण, एक मृत्यू कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडली शंभरी १०२ नवे रुग्ण, एक मृत्यू    Reviewed by News1 Marathi on February 10, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads