Header AD

इराणी वस्तीत पोलिसांवर हल्ला पोलिसांनी पकडलेल्या आरोपीला नेले सोडवून


◆रेल्वे फाटक बंद झाल्याने इराण्यांनी केला पोलिसांवर हल्ला  ...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण नजीक आंबिवली येथे असणाऱ्या इराणी वस्तीत पोलिसांवर हल्ला झाल्याची घटना आज घडली आहे. या हल्ल्यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून पोलिसांच्या गाड्यांची देखील तोडफोड करण्यात आली आहे. एका सराईत आरोपीला पोलिसांनी पकडून गाडीतून नेत असताना इराण्यांनी गोंधळ घालत तुफान दगडफेक केली. तसेच आरोपीची पोलिसांच्या ताब्यातुन सुटका करीत पोबारा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.


आंबिवलीच्या इराणी वस्तीमध्ये काही सराईत गुन्हेगारांना पडकण्यासाठी वसई नालासोपाराक्राईम ब्रांच पोलिसांचे पथक आले होते.  या पथकाने यापैकी एका आरोपीला पकडले आणि गाडीत बसवून नेत होते. नेमक्या त्याच वेळेला रेल्वे फाटक बंद असल्याने पोलिसांच्या दोन्ही गाड्या तिकडे अडकून पडल्या. आणि हीच संधी साधत इराणी वस्तीतील महिला आणि तरुणांनी पोलिसांच्या गाड्यांवर तुफान दगडफेक सुरू केली. तर काही जणांनी बांबूच्या सहाय्याने गाड्यांवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्याने पोलिसही भाबांवुन गेले. दोन गाड्यांपैकी एक गाडी कशीबशी तिथून दुसऱ्या मार्गाने निघून गेली. यामध्ये अमोल कोरे हा पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे.


याप्रकरणी कल्याणच्या खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी कल्याण विभागाचे एसीपी अनिल पोवार, खडकपाडा पोलीस स्टेशनचे व.पो.नि. अशोक पवार यांनी भेट देत घटनेचा आढावा घेतला.


दरम्यान इराणी वस्तीत पोलिस आरोपींना पकडण्यास आले असताना यापुर्वीही पोलिसांवर हल्ले झाल्याच्या घटना घडुन देखील याबाबत पोलीस प्रशासन कोणतही ठोस कारवाई करत नसल्याने पोलिसांवरील हे हल्ले थांबणार कधी असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

इराणी वस्तीत पोलिसांवर हल्ला पोलिसांनी पकडलेल्या आरोपीला नेले सोडवून इराणी वस्तीत पोलिसांवर हल्ला पोलिसांनी पकडलेल्या आरोपीला नेले सोडवून Reviewed by News1 Marathi on February 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads