Header AD

‘क’ प्रभाग क्षेत्र कार्यालया तील आधार कार्ड सुविधा केंद्र जेष्ठ नागरिक, दिव्यांगा साठी बनलय असुविधा केंद्र
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली मनपाच्या "क" प्रभाग क्षेत्र कार्यालय येथे सुरु असलेले आधार कार्ड सुविधा केंद्र हे दिव्यांगजेष्ठ नागरिकांसाठी असुविधा केंद्र बनलं आहे. या आधार कार्ड केंद्रात येणाऱ्या जेष्ठ नागरिकदिव्यांगाना दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.


कल्याण पश्चिमेतील कै. चंद्रकांत भोईर सभागृह "क" प्रभागक्षेत्र कार्यालय येथे सामान्य नागरिकांना आधार कार्ड काढण्यासाठीआधार कार्ड मधील दुरूस्ती संदर्भात आधार कार्ड केंद्र दुसऱ्या मजल्यावर सुरू आहे. आधार कार्डच्या कामानिमित्त येणाऱ्या  जेष्ठ नागरिकदिव्यांग यांना द्रविडी प्रणायम करावा लागत आहे.


 दुसऱ्या मजल्यावर जाताना पहिला मजल्याचा जिना दुसरा मजला या मधील जोडणाऱ्या भागात कठडे तसेच लोखंडी रेलिंग नसल्याने तसेच आधारासाठी दोरीचा देखील साहरा नसल्याने असुविधा होत आहे.  जेष्ठ नागरिकदिव्यांग यांच्या सुविधेसाठी दुसऱ्या मजल्यावरील आधार कार्ड केंद्र हे तळमजल्यावर हलविण्याची मागणी मनसे शहर संघटक रूपेश भोईर यांनी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

‘क’ प्रभाग क्षेत्र कार्यालया तील आधार कार्ड सुविधा केंद्र जेष्ठ नागरिक, दिव्यांगा साठी बनलय असुविधा केंद्र ‘क’ प्रभाग क्षेत्र कार्यालया तील आधार कार्ड सुविधा केंद्र जेष्ठ नागरिक, दिव्यांगा साठी बनलय असुविधा केंद्र  Reviewed by News1 Marathi on February 21, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे कारागृहात उभारणार क्रांति कारकांचे स्मारक

■ जिल्हाधिकारी, कारागृह, सार्वजनिक बांधकाम प्रशासना सह आमदार संजय केळकर यांचा पाहणी दौरा... ठाणे , प्रतिनिधी : ऐतिहासिक ठाण्याचे मानबिन्दू अ...

Post AD

home ads