गॅस दरवाढीच्या आंदोलनात किन्नरांचा सहभाग राष्ट्रवादीच्या महिलांनी थापल्या भाकऱ्या
कल्याण , कुणाल म्हात्रे : पेट्रोल डिझेल गॅस सह इंधनदरवाढी विरोधात राष्ट्रवादीने केंद्र सरकारला धारेवर धरत राज्यात आंदोलन पुकारलं आहे. या पार्श्वभूमीवर आज कल्याण शीळ रोड वरील टाटा नाका परिसरात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारयांनी घोषणाबाजी करून आंदोलन करत इंधन दरवाढी विरोधात केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. यावेळी चूल पेटवून भाकऱ्या थापून इंधन दरवाढीचा निषेध केला. विशेष म्हणजे या आंदोलनात एलजीबीटी सेलच्या प्रदेश सचिव माधूरी शर्मा या देखील सहभागी झाल्या होत्या.
गॅस दरवाढीच्या आंदोलनात किन्नरांचा सहभाग राष्ट्रवादीच्या महिलांनी थापल्या भाकऱ्या
Reviewed by News1 Marathi
on
February 06, 2021
Rating:

Post a Comment