खोणी ग्रुप ग्राम पंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीला गणपूर्ती अभावी स्थगिती.. उद्या होणार निकाल जाहीर
डोंबिवली, शंकर जाधव : कल्याण तालुक्यातील खोणी ग्रुप ग्रामपंचायत सोमवारी सरपंच पदाच्या निवडणुकीचा निकाल गणपूर्ती अभावी लागला नाही. त्यामुळे या गावातील वातावरण तणावपूर्ण असून ही निवडणूक उद्या मंगळवारी घेण्यात येईल असे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले. खोणी ग्रुप ग्रामपंचायतिच्या सरपंचपदाची निवडणूक नेहमीच चर्चेचा विषय राहील आहे.
या गावात नेहमीच निवडणुकीच्या काळात तणावपूर्ण वातावरण पहावयास मिळते. सोमवारी आयत्यावेळी एकूण ११ सदस्यांपैकी केवळ ज्योती हनुमान जाधव, वंदना ठोंबरे, योगश ठाकरे, जयेश म्हात्रे, आणि ज्योती विश्वास जाधव हे पाच सदस्य हजर राहिले होते. तर जयश्री ठोंबरे, हनुमान ठोंबरे, अरुणा ठाकरे, उज्ज्वला काळोखे,संजय पाटील,मुकुंद ठोंबरे हे सदस्य उपस्थित नव्हते.त्यांनतर निवडणूक अधिकाऱ्यांनी मुदत वाढवून दिली.मात्र दिलेल्या मुदतीत देखील सदस्य हजर राहिले नाहीत.
त्यामुळे आजची सरपंच पदाची निवडणूक स्थगिती देण्यात आली असून ही निवडणूक मंगळवारी घेण्यात येईल असे सांगितले.या निवडणुकीत जयश्री ठोंबरे, वंदना ठोंबरे यांनी सरपंच पदासाठी अर्ज केला होता. तर योगेश ठाकरे यांनी उपसरपंच पदासाठी अर्ज भरला होता.मात्र केवळ पाच सदस्य वेळेवर आल्यामुळे गणपूर्ती झाली नाही.काही सदस्यांनी हजेरी लावली मात्र ते वेळेनंतर आल्यामुळे आत्ता काहीच होणार नाही या आदेशावर निवडणूक अधिकारी ठाम होते.गेली पाच वर्ष खोणी ग्रुप ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता होती. हि सत्ता कायम राहील का दुसऱ्या पक्ष सत्तेवर बसले हे मंगळावारी दिसेल.

Post a Comment