Header AD

हाय रिप जॉ क्रशर मशिन द्वारे अति धोकादायक मुस्तफा मंजीलचे निष्कासनाचे काम सुरु
कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  हाय रिप जॉ क्रशर मशिनद्वारे अतिधोकादायक मुस्तफा मंजीलचे निष्कासनाचे काम आज सुरु करण्यात आल्याने या कामाला गती मिळाली आहे.  महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात बहुमजली इमारतींची अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यासाठी यापूर्वी जेसीबी, पोकलेन या यंत्रसामुग्रीचा वापर करण्यात येत होता, परंतू निष्कासनाचे काम अधिक सक्षमपणे करण्याकरीता महापालिकेने मंजूर निविदा धारकामार्फत हाय रिप जॉ क्रशर मशिन आज मागविली. या यंत्राचा वापर करुन धोकादायक, अतिधोकादायक सुमारे ७ ते ८ मजली इमारतींचे बांधकाम निष्कासित करणे सुलभ होणार आहे आणि या यंत्राने इमारतींचे निष्कासन केल्यामुळे वेळेची बचतही होणार आहे.


ऐतिहासिक कल्याण शहरातील महापालिका कार्यालयासमोरील मुख्यद्वारशंकरराव चौक येथील मुस्तफा मंजील या अतिधोकादायक इमारतीच्या‍ निष्कासनाचे ऊर्वरित काम आज या यंत्राचा वापर करुन सुरु करण्यात आले. हि मशिन ही महाराष्ट्रातील मोजक्याच शहरांमध्ये आहे. या यंत्राच्या वापराचा पहिलाच दिवस असल्याने नविन यंत्राचा वापर सुरु करतांना अति. आयुक्त तथा सह नियंत्रक (अबांनि) सुनिल पवारमुख्यलेखा परिक्षक लक्ष्मण पाटीलउपआयुक्त पल्लवी भागवतउप आयुक्त उमाकांत गायकवाडविभागिय उपआयुक्त विनय कुलकर्णीमहापालिका सचिव संजय जाधवसहा आयुक्त (साप्र) अरुण वानखेडे, सहा. आयुक्त सुहास गुप्तेक प्रभागक्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे आणि ठेकेदार शंकर चव्हाण या प्रसंगी उपस्थित होते.

हाय रिप जॉ क्रशर मशिन द्वारे अति धोकादायक मुस्तफा मंजीलचे निष्कासनाचे काम सुरु हाय रिप जॉ क्रशर मशिन द्वारे अति धोकादायक मुस्तफा मंजीलचे निष्कासनाचे काम सुरु Reviewed by News1 Marathi on February 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads