Header AD

भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी





भिवंडी  दि. १९ (प्रतिनिधी  ) राज्यासह भिवंडीत देखील छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली. ग्रामीण भागात अनेक ग्राम पंचायतींमध्ये यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर शहरात देखील अनेक राजकीय पक्षांच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली. भिवंडी महापालिकेच्या वतीने छ. शिवाजी चौक येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 


             या कार्यक्रमात महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी निंबवली येथील शैलेश प्रतिष्ठानच्या सदस्यांनी शिवचरित्रावर आधारित विविध मर्दानी शौर्य खेळ ज्यात ढाल तलवारबाजी, भालाफेक, प्रात्यक्षिक दाखवित सर्व उपस्थित रसिकांना स्तब्ध केले होते. यावेळी महापौर यांनी या सर्व शालेय विद्यार्थी यांचा भेट वस्तू देऊन गौरव केला.


                  त्यानंतर महापालिका मुख्यालयात उपायुक्त डॉ.दीपक सावंत, उपायुक्त दीपक झिंगाट, शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण व गुलाबपुष्प वाहून अभिवादन केले. यावेळी प्राथमिक शिक्षण विभागाचे उपायुक्त सुभाष झळके,प्रभाग समिती क्रमांक ५ चे सहायक आयुक्त सुधीर गुरव,प्रभाग समिती क्रमांक १ चे साहाय्यक आयुक्त दिलीप खाने अग्निशमन अधिकारी राजेश पवार, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले, निवडणूक विभाग प्रमुख गिरीष घोष्टेकर , अन्य अधिकारी कर्मचारी, विविध राजकीय पक्षांचे पुढारी मोठ्या संख्यने उपस्थित होते.
भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी  भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी Reviewed by News1 Marathi on February 19, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads