Header AD

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत शिवजयंती उत्साहात साजरी

 



कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली गेली. कल्याण पश्चिमेतील  शिवाजी चौकातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 महापालिका मुख्यालयातही महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्याच प्रमाणे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या दालनात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य प्रतिमेस व अर्ध पुतळ्यास देखील पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 


या समयी अतिरिक्त आयुक्त सुनील पवारकर निर्धारक व संकलक  विनय कुलकर्णी,  महापालिका सचिव संजय जाधवक प्रभागक्षेत्र अधिकारी भागाजी भांगरेसहा. जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे व इतर कर्मचारी वर्ग  उपस्थित  होता. डोंबिवलीतही महापालिकेच्या विभागीय उपायुक्त (फ व ग)पल्लवी भागवत यांनी मानपाडा रोड वरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत शिवजयंती उत्साहात साजरी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत शिवजयंती उत्साहात साजरी Reviewed by News1 Marathi on February 19, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मनविसेच्या विधान सभा शहरअध्यक्ष पदी मिलिंद म्हात्रे

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  मनविसेचे सागर जेधे यांनी मनविसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर मनसेचे जुने कार्यकर्ते मिलींद म...

Post AD

home ads