भिवंडीत सरपंच निवडणूक संपन्न शिवसेने चे वर्चस्व तर भाजप ९, काँग्रेस राष्ट्रवादी प्रत्येकी एका ग्राम पंचायतीवर विजयी
भिवंडी , प्रतिनिधी : भिवंडी तालुक्यात १५ जानेवारी रोजी झालेल्या निवडणुकीत भाजपा शिवसेना या दोन्ही कडून वर्चस्वाचा दावा केला जात असताना सोमवारी २८ ग्रामपंचायतींच्या सरपंच निवडीच्या विशेष सभा पार पडल्या यामध्ये भाजपा व शिवसेना या दोन्ही पक्षांनी प्रत्येकी १० ग्रामपंचायतींवर सत्ता स्थापन करण्यात यश मिळविले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षा सह आरपीआय सेक्युलर ,श्रमजीवी संघटना यांनी प्रत्येकी एका ग्रामपंचायतीवर झेंडा फडकविला आहे .तर चार ग्रामपंचायतींवर स्थानिक ग्राम विकास समितीने सत्ता प्रस्थापित केली आहे .
भिवंडी तालुक्यातील चुरशीच्या ग्रामपंचायत निवडणुकी नंतर सर्वांचे लक्ष सरपंच निवडीच्या सभे करीता लागले असते सोमवारी झालेल्या २८ ग्रामपंचायत सरपंच निवडीच्या प्रक्रियेत भाजपाने वळ, पुर्णा, काल्हेर ,नांदकर, भिनार, कुकसे ,दिवे अंजुर,निवळी आशा नऊ ग्रामपंचायत ,तर लाखीवली, शेलार या ठिकाणी उपसरपंच पदावर भाजपाने बाजी मारली असून शिवसेनेने बारा ग्रामपंचायतीवर भगवा फडकवला आहे या मध्ये दापोडे,गुंदवली, कांदळी,सोनाळे ,पिसे चिराड पाडा ,वडवली तर्फे राहुर, लामज,चावे ,खांबाळ ,खांडपे या ग्रामपंचायतींवर झेंडा फडकविला आहे . श्रमजीवी संघटनेने लाखीवली,आरपीआय सेक्युलर ने शेलार ग्रामपंचायत सरपंच पदावर बाजी मारली आहे .
दयानंद चोरघे यांच्या नेतृत्वा खाली काँग्रेसने सरवली तर महेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खारबाव ग्रामपंचायती वर झेंडा फडकविला आहे .तर शेलार या ग्रामपंचायत या अनुसूचित जाती साठी राखीव ग्रामपंचायतीवर आरपीआय सेक्युलर चे ऍड. किरण चन्ने हे सरपंच तर बहुमतात असलेल्या भाजपाच्या ज्योत्स्ना दशरथ भोईर या विजयी झाल्या आहेत .कांदळी या ग्रामपंचायतीवर शिवसेना ग्रामीण विधानसभा संपर्क संघटक विष्णू चंदे यांचा वरचष्मा राहिला असून बिनविरोध निवडणुकीत त्यांनी नम्रता ज्ञानेश्वर जाधव व नितीन विष्णू गोष्टे या दोघांची सरपंच उपसरपंच पदावर वर्णी लागली.
पिसे चिरडपाडा या ग्रामपंचायतीवर शिवसेना उपतालुक प्रमुख विजय पाटील यांनी वर्चस्व प्रस्थापित करीत पत्नी रिंकल विजय पाटील यांना सरपंच पदी विराजमान केले आहे .सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या सरवली ग्रामपंचायती वर काँग्रेसचे वर्चस्व राखण्यात दयानंद चोरघे यांनी यश मिळविले असून संध्या नितेश चौधरी व करण किशोर मार्के या दोघा युवा सदस्यांनी भाजपा शिवसेना पुरस्कृत उमेदवारांचा पराभव करुन विजय मिळविला तर राष्ट्रवादी काँग्रेस ने वर्चस्व मिळविलेल्या खारबाव ग्रामपंचायतींच्या सरपंच पदी महेंद्र पाटील व उपसरपंच पदी रेश्मा संदीप पाटील निवडून आले आहेत .सुरई सारंग ,आलिमघर या ठिकाणी ग्राम विकास समिती पुरस्कृत सत्ता स्थापन झाली आहे .
भिवंडीत सरपंच निवडणूक संपन्न शिवसेने चे वर्चस्व तर भाजप ९, काँग्रेस राष्ट्रवादी प्रत्येकी एका ग्राम पंचायतीवर विजयी
Reviewed by News1 Marathi
on
February 08, 2021
Rating:

Post a Comment