खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट विविध नागरी विकास कामांचा घेतला आढावा
कल्याण, कुणाल म्हात्रे : कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या दालनात आयोजित बैठकीत मनपा परिक्षेत्रात प्रस्तावित तसेच सुरु असलेल्या विविध नागरी विकास कामांचा आढावा घेत कामांना गती देत लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात महत्वपूर्ण सूचना केल्या. आयुक्तांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत सदर कामे वेळेत पूर्ण करण्याची ग्वाही दिली.
उल्हास नदीच्या स्वच्छतेसंदर्भात चर्चा करताना नदीच्या पाण्यात सोडण्यात येत असलेल्या सांडपाणी तसेच रसायन मिश्रित पाण्यामुळे नदीचे पाणी प्रदुषित होत असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जलपर्णी निर्माण झाली आहे. उल्हास नदीतील प्रदुषण रोखण्यात यावे यासाठी तातडीने उपाय योजना कराव्यात तसेच नदीमध्ये निर्माण झालेली जलपर्णी तातडीने साफ करण्याच्या सूचना दिल्या. कल्याण - डोंबिवली मनपा क्षेत्रातील बीएसयूपी योजनेतील ज्या लाभार्थींना अद्यापही घरे मिळाली नाहीत, त्यांना लवकरात लवकर त्यांच्या हक्काचे घर मिळेल यासंदर्भात खासदारांनी सूचना केल्या. तसेच कल्याण पूर्व येथिल प्रस्तावित डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचा आढावा घेतला.

Post a Comment