Header AD

गोविंदवाडी येथील १०० वर्ष जुन्या विहिरी साठीचे उपोषण ५ व्या दिवशी मागे


◆आयुक्तांच्या बैठकीत निर्णय घेऊन विहीर खुली करण्याचे आश्वासन....


कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  ।कल्याण पश्चिमेतील गोविंदवाडी येथील १०० वर्ष जुन्या विहिरीसाठीचे आमरण उपोषण ५ व्या दिवशी मागे घेण्यात आले आहे. आयुक्तांच्या बैठकीत निर्णय घेऊन विहीर खुली करण्याचे आश्वासन पालिकेचे अतिरिक्त आयुक्तांनी दिल्या नंतर सामाजिक कार्यकर्ते इकराम जाफरी यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.   


कल्याणच्या गोविंदवाडी परिसरातील  १०० वर्षाहून अधिक जुनी विहीर बुजवून याठिकाणी इमारत उभारण्यासाठी पालिकेची परवानगी मिळविण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र विहीर बुजविल्याने या परिसरात राहणाऱ्या शेकडो नागरिकांचे पाण्याचे हाल झाले असून हि विहीर परत मिळावी या मागणीसाठी इकराम जाफरी यांनी पालिका मुख्यालयासमोर उपोषण सुरु केले होते.


कल्याणच्या गोविंदवाडी या मुस्लीम बहुल वस्तीत सुमारे ३०० ते ४०० घरे असून ६०० हून अधिक कुटुंबे मागील ५० ते ६० वर्षापासून पागडी पद्धतीच्या घरामध्ये वास्तव्य करत आहेत. या नागरिकाच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी मध्यवर्ती भागात विहीर होती. या विहिरीतील गाळ काढून आजूबाजूचे नागरिक या विहिरीच्या पाण्याचा पिण्यासाठी आणि इतर कामासाठी वापर करत होते. या भागात महापालिकेची पाण्याची टाकी नसून नळाचे कनेक्शन देखील नाही. आता मात्र जमिनीचे भाव वधारल्याने जागा मालकाने या वस्तीला पिण्याचे पाणी देणारी इतिहास कालीन विहीर  मातीकचरा टाकून हि विहीर बुजवली आहे. यामुळे नागरिकाच्या त्रासात भर पडली आहे. आता विहिरीच्या जागेवर जागा मालकाला इमारत बांधायची असून यासाठी पालिकेकडे त्याने रीतसर परवानगी मागितली आहे.


 मात्र इतिहास कालीन विहीर बुजवून इमारत बांधण्यास परवानगी न देता विहिर सुरक्षित ठेवली जावीज्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना पिण्याचे पाणी मिळेल आणि नैसर्गिक ज्लस्त्रोताचे संवर्धन होऊ शकेल अशी मागणी करत स्थानिक नागरिक इकराम जाफरी यांनी पाच दिवसापासून पालिका मुख्यालयासमोर उपोषण सुरु केले होते. आपण मागील ३ वर्षे हि विहीर वाचावी यासाठी पालिकेकडे पाठपुरावा करत असून प्रशासनाकडून केवळ आश्वासन देत विकासकाची पाठराखण केली जात असल्याचा आरोप जाफरी यांनी केला आहे.


तर आज उपोषणाच्या पाचव्या दिवशी पालिका प्रशासनाच्यावतीने उपोषणकर्त्यांना अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात बोलवून घेण्यात आले. यावेळी येत्या २४ तारखेला पालिका आयुक्तांकडे याबाबत बैठक घेऊन यामध्ये दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून विहीर नागरिकांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. पालिकेच्या या आश्वासना नंतर इकराम जाफरी यांनी आपले उपोषण ५ व्या दिवशी मागे घेतले आहे.
 
गोविंदवाडी येथील १०० वर्ष जुन्या विहिरी साठीचे उपोषण ५ व्या दिवशी मागे गोविंदवाडी येथील १०० वर्ष जुन्या विहिरी साठीचे उपोषण ५ व्या दिवशी मागे Reviewed by News1 Marathi on February 12, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads