Header AD

रिक्षा चालकांना दिले प्रथमोपचाराचे धडे
कल्याण , कुणाल म्हात्रे  :  ३२ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून कल्याणमध्ये रिक्षा चालकांना प्रथमोपचाराचे धडे देण्यात आले. रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन कल्याण शहर आणि फोर्टिस हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने कल्याण शहरातील रिक्षा चालकांसाठी विनामुल्य आरोग्य तपासणी व बी.एल.एस प्रशिक्षण शिबिराचे आयोजन फोर्टिस हॉस्पिटल जवळ करण्यात आले होते.


       रिक्षा चालवतांना रिक्षा चालकांना अनेक अपघातांना सामोरे जावे लागते. अनेक वेळा रिक्षा चालकांच्या समोर देखील अपघात घडत असतात. अशावेळी अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला वेळेत उपचार मिळणे आवश्यक असते. अपघाताचे घटना स्थळ ते त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेई पर्यंत वेळ गेल्याने अनेक वेळा अपघातग्रस्त व्यक्तीला आपल्या प्राणांना मुकावे लागते. अशावेळी जखमी व्यक्तीला प्रथमोपचार मिळणे गरजेचे असते. यासाठीच रिक्षाचालकांना डॉ. मनजीत सिंग सैनी यांनी बेसिक लाईफ सपोर्ट प्रशिक्षण दिले.


       यावेळी रिक्षाचालकांना विविध प्रात्यक्षिकांद्वारे जखमी व्यक्तीला अथवा एखाद्या बेशुद्ध व्यक्तीला कसा प्रथमोपचार देता येईल याचे धडे दिले. या प्रशिक्षण शिबिरानंतर रिक्षा चालकांची विनामुल्य आरोग्य तपासणी देखील करण्यात आली. यामध्ये उंची, वजन, बॉडी मास इंडेक्स, रेंडम ब्लड शुगर, रक्तदाब, ई.सी.जी., ऑक्सिजन सॅच्युरेशन, तापमान तपासणी तसेच डोळ्यांची तपासणी करण्यात येऊन डॉक्टरांचा सल्ला देखील देण्यात आला.


       यावेळी डॉ. मनजीत सिंग सैनी, उप प्रादेशिक मोटार वाहन निरीक्षक दिपक शिंदे, रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन कल्याण शहर अध्यक्ष प्रकाश पेणकरसंतोष नवलेजितेंद्र पवारविलास वैद्यप्रणव पेणकर आदींसह रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रिक्षा चालकांना दिले प्रथमोपचाराचे धडे  रिक्षा चालकांना दिले प्रथमोपचाराचे धडे Reviewed by News1 Marathi on February 13, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीत लाखो रुपयांवर डल्ला मारणाऱ्या ग्रामसेविकेस निलंबित करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले टाळे...

भिवंडी दि 25 (प्रतिनिधी ) ग्रामपंचायतीं करीता राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत विकास कामांसाठी लाखो रुपये दिले जात अ...

Post AD

home ads